रशियात पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू, स्पुतनिक लसीलाही नागरिकांचा नकार

| Updated on: Oct 16, 2021 | 6:35 PM

रशियामध्ये कोरोनामुळे 24 तासांच्या आत 1002 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत.

रशियात पुन्हा कोरोनाचा कहर, एका दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू, स्पुतनिक लसीलाही नागरिकांचा नकार
रशियात पुन्हा कोरोनाचा कहर (फोटो-AFP)
Follow us on

कोरोनाव्हायरसची आकडेवारी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. रशियामध्ये कोरोनामुळे 24 तासांच्या आत 1002 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू झाले आहेत. रशियामध्ये लसीकरण मोहीमही चांगल्या प्रमाणात सुरु आहेत. मात्र, कोरोना नियम आता कुणीही पाळत नाही, परिणामी पुन्हा कोरोना डोकं वर काढू लागला आहे. (Coronavirus latest update russia tops 1000 daily virus deaths for first time)

गेल्या 24 तासांत 33,208 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. सलग तिसरा दिवस आहे जेव्हा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रशियामध्ये कोरोना अशा वेळी वाढत आहेत जेव्हा तो सगळ्या जगाला स्पुतनिक ही लस पुरवत आहे. आतापर्यंत देशातील केवळ 31 टक्के लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.

सरकार नियमांबाबत कठोर नाही

रशियात कोरोना नियम अतिशय शिथील आहे. यामुळे प्रकरणंही वाढत आहेत. मात्र, अनेक सार्वजनिक ठिकाणी येण्यासाठी पुन्हा क्यूआर कोड सुरू करण्यात आला आहे. देशात लसीकरणाचं प्रमाण खूपच कमी असताना क्रेमलिनने कोणतेही मोठे निर्बंध लादलेले नाहीत. सरकार म्हणतं की, त्यांना खात्री करावी लागेल की देशातील अर्थव्यवस्था पुन्हा रुळावरून घसरणार नाही. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रशियाची वैद्यकीय यंत्रणा पूर्णपणे तयार असल्याचा सरकारचा दावा आहे. तसंच, सध्याच्या परिस्थितीत वाढती प्रकरणं रशियन सरकारने फार मनावर घेतलेली नाहीत. दरम्यान रशियन प्रशासनाने वाढत्या प्रकरणांसाठी नागरिकांनाच जबाबदार धरलं आहे.

रशियन लोक लसीबद्दल चिंतेत

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुरासखो यांनी अलीकडेच सांगितले की, लोकांच्या वर्तवणुकीमुळे कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. तर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले होते की, लसीद्वारे जीव वाचवण्यासाठी सर्वकाही केले जाईल. रशियाचे नागरिक त्यांच्याच देशातील लसीला घाबरत आहेत. अर्ध्याहून अधिक रशियन लस न घेण्याच्या पवित्र्यात आहेत.

रशियामध्ये सर्वाधिक मृत्यू आहेत

रशियामध्ये आतापर्यंत 2,22,315 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, हा आकडा संपूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक आहे. रशियन प्रशासनावर योग्य आकडेवारी सादर न केल्याचा आरोप असताना ही परिस्थिती आहे. एका एजन्सीने दावा केला आहे की, ऑगस्टच्या अखेरीपर्यंत रशियामध्ये कोरोनाव्हायरसमुळे चार लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा:

Know This: ज्यांनी जगाला वेड लावलं, ते हजारो टन अफगाणी डाळिंब पाकिस्तानच्या सीमेवर का सडत आहेत? वाचा सविस्तर

Labour Shortage in UK: इंग्लंडला जायचंय? खाटीक होण्याची संधी, 800 जणांना व्हिसा देणार