Labour Shortage in UK: इंग्लंडला जायचंय? खाटीक होण्याची संधी, 800 जणांना व्हिसा देणार

सरकारने जाहीर केले की, परदेशातून डुकराचे मांस कापणारे खाटीक 31 डिसेंबरपर्यंत व्हिसासाठी अर्ज करू शकतात, ज्यामुळे त्यांना ब्रिटनमध्ये सहा महिने काम करता येईल.

Labour Shortage in UK: इंग्लंडला जायचंय? खाटीक होण्याची संधी, 800 जणांना व्हिसा देणार
ब्रिटनने 800 खाटीकांना देशात काम करण्याची परवानगी दिली आहे

ब्रिटन सरकारने गुरुवारी सांगितले की, त्यांनी आणखी 800 खाटीकांना देशात काम करण्याची परवानगी दिली आहे. पण हे लोक फक्त तात्पुरत्या व्हिसावर काम करू शकतील. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे, ज्यात त्यांनी मांस प्रक्रियेच्या कामात कामगारांची कमतरता भासत असल्याचे म्हटलं आहे. यामुळे त्यांना हजारो निरोगी डुकरांना मारावं लागलं आहे. यापूर्वी, डुकराचे मांस उद्योगाने (Pig Industry UK) इशारा दिला होता की, कत्तलखान्यांमधील समस्यांमुळे 150,000 डुकरांना मारले जाऊ शकते. ( Britain extends visa deadline for overseas butchers amid labor shortage in UK)

सरकारने जाहीर केले की, परदेशातून डुकराचे मांस कापणारे खाटीक 31 डिसेंबरपर्यंत व्हिसासाठी अर्ज करू शकतात, ज्यामुळे त्यांना ब्रिटनमध्ये सहा महिने काम करता येईल. सरकारचं हे पाऊल तात्पुरतं आहे. त्यामुळे ब्रिटनने आधीच्या एक्स्पर्ट खाटीकांच्या नियमांमध्ये शिथीलता दिली आहे.(Visa Rules in Britain) याशिवाय आता ब्रिटन सरकारकडून अतिरिक्त मांस साठवणुकीसाठी निधी दिला जाईल. या प्रक्रियेचे काम शनिवारपासूनच सुरू होत आहे. शिवाय, खाटीकांचे कामाचे तास वाढवले जाणार आहेत. (Labour Shortage in UK)

मांस उद्योगांसमोर मोठी आव्हानं

सरकारचे म्हणणे आहे की, डुक्करांच्या मांस उद्योगाला गेल्या काही काळापासून आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. पहिल्या कोरोना महामारीत त्याचा वापर कमी झाला. यानंतर, चीनला होणारी निर्यात तात्पुरती स्थगित करण्यात आली, जेणेकरून देशाची वाढती मागणी पूर्ण होऊ शकेल. आता पर्यावरण सचिव जॉर्ज युस्टिस म्हणतात की, खाटीकांची कमी पूर्ण झाली नाही तरी डुकरं अशीच मरतील. तर नॅशनल फार्मिंग युनियनचे उपाध्यक्ष टॉम ब्रॅडशॉ म्हणाले की, व्हिसाची घोषणा ही “योग्य दिशेने एक पाऊल” आहे.

भाषेचे नियम शिथिल

नॅशनल पिग असोसिएशन (NPA) ची मुख्य कार्यकारी जोय डेव्हिस म्हणाले की, त्यांना आशा आहे की, सरकार भाषेचे नियम सुलभ करेल, जेणेकरून शेकडो कुशल खाटीक (UK Butchers Block) लवकरच ब्रिटनमध्ये येऊ शकतील. त्यांनी यावेळी इशारी दिला, ते म्हणाले की, ‘आम्हाला कमी वेळेत जास्त लोकांची गरज आहे. आमच्याकडे काही महिने थांबायला वेळ नाही. यामुळे विनाकारण प्राण्यांचा मृत्यू होण्याचा धोका वाढेल.हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनमध्ये कामगारांची कमतरता आहे. यामुळे देशातील पुरवठा साखळीवरही मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचा:

मॉल, किराणा शॉप्स रिकामे, कुणाला पेट्रोल, कुणाला किराणा मिळेना, ब्रिटनमध्ये सैनिक ट्रक चालवण्याच्या तयारीत

कॅलिफोर्नियात विमानाचा मोठा अपघात, मूळच्या पुण्यातील डॉक्टरसह आणखी एकाचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI