कोरोना : गरीब देशामधील 90 टक्के लोक लसीकरणापासून ‘या’ कारणामुळे वंचित राहणार

| Updated on: Dec 10, 2020 | 10:47 AM

श्रीमंत देशांनी गरजेपेक्षा जास्त लसींची खरेदी केल्याने गरीब देशामधील लोक लसीकरणापासून 2021 मध्येही वंचित राहतील. (Corona Vaccine Poor Nations)

कोरोना : गरीब देशामधील 90 टक्के लोक लसीकरणापासून या कारणामुळे वंचित राहणार
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा संसर्ग जगभरातील 6 कोटी 80 लाखहून अधिक लोकांना झाला. जगातील सुमारे 15 लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. भारतातही 1 लाख 40 हजाराहूंन अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाच्या एक वर्षानंतर कोरोनावरील लसीच्या वापराला ब्रिटन पाठोपाठ कॅनडाने मंजुरी दिली आहे. मात्र, जगातील श्रीमंत देशांनी गरजेपेक्षा जास्त लसींची खरेदी केल्याने गरीब देशामधील 90 टक्के लोक लसीकरणापासून 2021 मध्येही वंचित राहणार आहेत. (coronavirus ninety peoples of poor nation may not get corona vaccine)

भारतासह जगातील अनेक देश कोरोना विषाणू संसर्गाविरोधात लढत आहेत. भारतातही कोरोवरील लसींच संशोधन सुरु आहे. पीपल्स वॅक्सिन आघाडीने पुढील वर्षीही गरीब देशामधील 10 पैकी 9 लोक लसीकरणापासून वंचित राहतील, असा दावा केला आहे. श्रीमंत देशांनी गरजेपेक्षा जास्त लसींचा साठा खरेदी केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (coronavirus ninety peoples of poor nation may not get corona vaccine)

जगातील 14 टक्के लोकसंख्या असणाऱ्या श्रीमंत देशांनी कोरोनारोधक लसीचा 53 टक्के साठा खरेदी केला आहे. पीपल्स वॅक्सिन आघाडीनं कोरोना लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची मागणी केली. कोरोना लसनिर्मिती पद्धत खुल्या स्वरुपात जाहीर करण्याची मागणी देखील करण्यात आलीय.

पीपल्स वॅक्सिन आघाडीचे सल्लागार मोहगा कमल-यानि यांनी कोरोना लस सुरक्षित ठेवण्यावरुन देशांमध्ये संघर्ष होऊ नये, असं म्हटलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळात लसीकडे उत्पादन म्हणून पाहू नये, असं देखील ते म्हणाले. ब्रिटनमध्ये अतिजोखीम असणाऱ्या लोकांना फायजर आणि बायोएनटेकची लस दिली आहे. मात्र, जगातील 67 कमी उत्पन्न असणाऱ्या देशातील लोक कोरोना लसीकरणापासून वंचित राहू शकतात.(coronavirus ninety peoples of poor nation may not get corona vaccine)

ऑक्सफोर्ड आणि एस्ट्रोजेनका कंपनीनं कोरोना लस विकसनशील देशांना देण्याचा दावा केला आहे. यामुळे जगातील 18 टक्के लोकांनाच कोरोना लस मिळू शकते. ऑक्सफॅमच्या माहितीनुसार युरोपीय संघ, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, मकाऊ, न्यूझीलंड, इस्त्रालय आणि कुवेत या देशांनी 53 टक्के तयार होणाऱ्या लसींचा साठा खरेदी करुन ठेवला आहे.

ब्रिटन आणि कॅनडाची लसीला मंजुरी

ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपत्कालीन वापरासाठी फायझर-एनबायोएनटेक लसीला मंजुरी दिली. मंगळवारी (8 डिसेंबर) इथं लसीकरण सुरू करण्यात आलं. भारतीय वंशाचे हरि शुक्ला हे कोरोना लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. मंगळवारी (8 डिसेंबर) त्यांना फायझर-बायोटेकची कोरोना लस देण्यात आली आहे. कॅनडाने फायझर-एनबायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे.

संबंधित बातम्या:

‘लस टोचल्यानंतर दोन महिने दारूला हात लावू नका’, रशिया सरकारचा नागरिकांना इशारा

ब्रिटननंतर कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

(coronavirus ninety peoples of poor nation may not get corona vaccine)