ब्रिटननंतर कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये या महिनाभरात लसीचे 2 लाख 49 हजार डोस मिळणार आहे. कॅनडा सरकारने लसीच्या एकूण 2 कोटी डोसची खरेदी केली आहे.

ब्रिटननंतर कॅनडाकडूनही फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीला मंजुरी

ओटावा: कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयानं फायझर-बायोएनटेकच्या (Pfizer-BioNtech) कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी ब्रिटन फायझरच्या कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला होता. इतकच नाही तर ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरणालाही (vaccination) सुरुवात करण्यात आली आहे. कॅनडाच्या कोरोना विरोधातील लढाईत ही लस म्हणजे मोठं यश मानलं जात आहे. त्याचबरोबर सर्व शक्यता पडताळूनच या लसीला मंजुरी दिल्याचं कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.(Approval of Pfizer-Bioentech’s Corona vaccine in Canada)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये या महिनाभरात लसीचे 2 लाख 49 हजार डोस मिळणार आहे. कॅनडा सरकारने लसीच्या एकूण 2 कोटी डोसची खरेदी केली आहे. जी कॅनडातील एक कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कॅनडामध्ये लसीचा पुरवठा झाल्यानंतर लगेच लसीकरणालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. तेथिल अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कॅनडामध्ये एकूण 14 वितरण केंद्र उभारण्यात आली आहे. तर जिथे गरज आहे त्याठिकाणी शितगृहांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

कॅनडामध्ये सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी आणि जे अस्थावस्थ किंवा गंभीर परिस्थितीमध्ये आहेत अशा नागरिकांना लस दिली जाणार आहे. सुरुवातीला लसीचा उपयोग हा 16 वर्षाहून अधिक वय असलेल्या नागरिकांवर करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कॅनडा सरकारने या लसीला दिलेली मंजुरी ही कॅनडातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि कॅनडातील कोरोना पीडित लोकांची संख्या कमी करण्याच्या दिशेनं एक ऐतिहासिक पाऊल असल्याचं फायझरने म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात

ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे ज्याने आपत्कालीन वापरासाठी फायझर-बायोटेक लसीला मंजूरी दिली. मंगळवारी इथं लसीकरण सुरू करण्यात आलं. भारतीय वंशाचे हरि शुक्ला हे कोरोना लसीचा डोस घेणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत. मंगळवारी त्यांना फायझर-बायोटेकची कोरोना लस देण्यात आली आहे.

भारत सरकारचा मेगा प्लॅन

भारतात कोरोना लसीचा मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने लसीकरण्यासाठी आखून दिलेल्या समितीने आधी लस कुणाला द्यायची याबाबत काही सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 1 कोटी आरोग्य कर्मचारी, 2 कोटी पोलीस, आर्मी आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना लस देण्याचं सूचवण्यात आलं आहे. तर 27 कोटी 50 वर्षावरील आणि 50 वर्षाखालील नागरिकांना लस देण्यास सूचवण्यात आलं आहे. लसीकरण्यासाठी प्रत्येक राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर टास्क फोर्स असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या:

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

कोरोना लशीच्या नोंदणीसाठी ‘हे’ अ‍ॅप लोकांना मदत करणार, आरोग्य मंत्रालयाची माहिती

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?

Approval of Pfizer-Bioentech’s Corona vaccine in Canada

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI