
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यातील दोन दिवसांचा सायप्रस दौरा त्यांचा पूर्ण झाला आहे. सायप्रसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक स्वागत झाले. त्या दरम्यान एक भावूक क्षणही समोर आला. एका महिला नेत्याने त्यांना चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या महिला नेत्या निकोसिया शहरातील नगरपालिकेच्या सदस्य मिकाएला किथ्रियोटी म्लापा आहेत. त्यांनी भारतीय परंपरेने नरेंद्र मोदी यांना चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. ही घटना सायप्रसचे राष्ट्रपती निकोसी आणि पंतप्रधान मोदी ऐतिहासिक सीजफायर लाइनचा दौरा करत असताना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी अनेक वेळा महिलांना त्यांचा पाया पडण्यापासून रोखले आहे. सायप्रसमध्ये म्लापा यांना आशीर्वाद देताना ते हात जोडलेले दिसत आहे. भाजप प्रवक्ता सी. आर. केसवन यांनी एक्सवर लिहिले आहे की, आधी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चरणस्पर्श करत त्यांचे आशीर्वाद घेतले. आता सायप्रसच्या नगरपरिषदेतील सदस्या मिकाएला यांनी आशीर्वाद घेतले. हा प्रकार भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची जगभरात झालेली ओळख आहे. भारताच्या शक्तीबरोबर प्रतिष्ठा आणि गौरवसुद्धा जागतिक पातळीवर वाढला आहे.
In a deeply moving moment in the historic centre of Nicosia, Council Member Michaela Kythreoti Mhlapa bowed to touch the feet of Hon'ble PM Shri @narendramodi ji — a gesture of profound respect. 🇮🇳🇨🇾
This heartfelt exchange reflects how India's timeless values of humility and… pic.twitter.com/fd5q7veDp6
— Pralhad Joshi (@JoshiPralhad) June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा सम्मान यापूर्वी अनेक वेळा झाला आहे. मे 2023 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोरेस्बी पोहचले होते. तेव्हा पापुआ न्यू गिनीची पंतप्रधान जेम्स मारापे यांनी त्यांचे स्वागत करत चरणस्पर्श केले होते. मोदी यांना महान नेता म्हणत सन्मानही दिला होता. सोमवारी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस तृतीय” या पुरस्कारने गौरव केला. सायप्रसमधील हा सर्वोच्च नागरिक सम्मान आहे. विदेशातील राष्ट्राकडून मोदी यांना मिळालेला हा 23वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
राष्ट्रपती निकोस यांनी म्हटले की, 23 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांची ही ऐतिहासिक यात्रा आमच्यासाठी गौरवास्पद आहे. या दौऱ्यामुळे व्यापार, उद्योग, सुरक्षा, तंत्रज्ञान, पर्यटन या क्षेत्रात दोन देशांतील संबंध अधिक द्दढ होणार आहे.