
मागील काही दिवसांपासून भारतावर अनेक निर्बंध अमेरिकेकडून लावले जात आहेत. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. फक्त 50 टक्के टॅरिफच नाही तर भारताला थेट धमकी देखील 500 टक्के टॅरिफ लावण्याची अमेरिकेकडून देण्यात आली. भारतावर विविध प्रकारचे निर्बंध लादताना सध्या अमेरिका दिसत आहे. रशियाकडून तेल खरेदी भारताने बंद केली नाही तर गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील, असे स्पष्ट शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात संवाद होतो आणि त्यांनी सध्या रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, असे सांगूनही डोनाल्ड ट्रम्प भारतावर निर्बंध लादत आहेत. भारत आणि रशियाचे अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत. मात्र, असे असतानाही अमेरिकेच्या दबावामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याची वेळ आली.
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल, असे सांगितले गेले. पण प्रत्यक्षात तसे न घडता भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आणि होणारे नुकसान भरून काढले. भारताविरोधात अमेरिका एका मागून एक पाऊले उचलताना दिसत आहे. मग काय भारतानेही अमेरिकेला थेट अत्यंत मोठा दणका दिल्याचे बघायला मिळत आहे, ज्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भारतात सर्वात जास्त कडधान्य उत्पादन होते. भारतातून अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात डाळींची निर्यात होते. भारताने देखील अमेरिकेच्या नाकावर टिच्चून थेट मोठा टॅरिफ लावला. भारतीय डाळींवर 30 टक्के टॅरिफ लावण्यात आला, ज्यामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली.
भारताने लावलेल्या टॅरिफमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून हा टॅरिफ भारताने पूर्णपणे रद्द करावा याकरिता प्रयत्न केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, ही व्यापार चर्चा काही मुद्द्यांमुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यामध्येच भारताने अमेरिकेच्या विरोधात इतका मोठा निर्णय घेतला.