AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना महामारीत युद्धाचे ढग, जाणून घ्या इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्षाची कहाणी

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळं युद्धाची शक्यता वर्तवली जातेय. (israel palestine conflictc)

कोरोना महामारीत युद्धाचे ढग, जाणून घ्या इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्षाची कहाणी
israel palestine conflict
| Updated on: May 14, 2021 | 9:25 PM
Share

जेरुसलेम : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनध्ये सध्या सुरु असलेल्या संघर्षामुळं युद्धाची शक्यता वर्तवली जातेय. दोन्ही देशांकडून सैन्याची जमवाजमव सुरु आहे. कोरोना महासाथीचा सामना करणाऱ्या जगाला आता या युद्धाच्या चिंतेनंही ग्रासलंय. हा संघर्ष आत्ताच का उफाळला, दोन्ही देशांची भूमिका काय आहेत, इतर देशांकडून काय प्रतिक्रिया उमटल्या हे सर्व जाणून घेणं गजरेचं आहे. (detail information of israel palestine conflict)

कोरोना महामारीत जमतायत युद्धाचे ढग

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या सुरु असलेला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. उलट इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सैन्याला सीमेवर जमावजमव करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सोमवारपासून इस्रायली तरुण आणि पॅलेस्टाईनमधले अरब तरुण एकमेकांची घरं, इमारतींवर तुफान हल्ले करतायत. गाझा पट्टीत सुरु असलेला हा संघर्ष प्रचंड हिंसक बनलाय. या दोन देशांतला 2014 पासूनचा हा सर्वात मोठा संघर्ष आहे. रात्रीच्या आकाशात जळते बाँबगोळे, रॉकेट एकमेकांवर फेकले जातायत. शुक्रवारपर्यंत या संघर्षात पॅलेस्टाईनचे 27 मुलांसह 119 आणि इस्रायलचे 8 नागरिक ठार झाले आहेत.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या उंबरठ्यावर

गाझा पट्टीवर सध्या पॅलेस्टाईनचा ताबा आहे, पण सीमारेषेवर 7 हजार इस्रायली सैन्य जमवण्यात आलंय. इस्रायलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू हमासला धडा शिकवण्याचा चंग बांधून आहेत. मात्र, इस्रायल-पॅलेस्टाईनमधील ही तणावाची स्थिती पाहून संयुक्त राष्ट्रांनी सैन्यमाघारीचं आवाहन करुन शांतता राखावी अशी विनंती केलीय. अमेरिकेनंही असंच आवाहन केलंय. पण परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही. जागतिक समुदायानं आमच्यावर दबाव टाकल्यास तोडीस तोड उत्तर देऊ असं हमासनं म्हटलंय.

ऐतिहासिक संघर्षाचा घटनाक्रम

1920 – पहिल्या महायुद्धात उस्मानियाच्या पराभवानंतर पॅलेस्टाईनवर ब्रिटनने कब्जा केला. यावेळी पॅलेस्टाईनमध्ये अल्पसंख्यक यहुदी व पॅलेस्टीनी अरबांचे वास्तव्य होते

1925- जागतिक समुदायाकडून पॅलेस्टाईनवर यहुदींना कायम करण्याचे काम सोपवले गेले.

1920-40- यहुदी आणि अरबांचा पॅलेस्टाईन हेच आमचे मूळ घर आहे, असा दावा करणे सुरु झाले. तसेच याच काळात दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक यहुदींचे पॅलेस्टाईनमध्ये आगमन सुरु झाले. याच काळात यहुदी, पॅलेस्टीनी आणि ब्रिटन शासकांत संघर्षाला सुरुवात झाली.

1947- संयुक्त राष्ट्रसंघाकडून पॅलेस्टाईनचे यहुदी आणि अरबांमध्ये विभाजन करावे की नाही ? यावर मतदान झाले. जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा देण्यात आला. हा निवाडा यहुदींनी मान्य केला. तर हा निवाडा अरबांनी अमान्य केला.

1948- ब्रिटनने पॅलेस्टाईनमधून माघार घेतली. तसेच ब्रिटीशांनी पॅलेस्टाईनचा ताबा सोडला.

1948 – ब्रिटीश जाताच यहुदींनी इस्रायल देशाची घोषणा केली. त्यानंतर पॅलेस्टीनींकडून युद्धाला सुरुवात झाली. या युद्धानंतर बहुतांश प्रदेश इस्रायलकडे गेला.

1967- या वर्षी इस्रायल-पॅलेस्टीनींमध्ये पुन्हा युद्ध झाले. इस्रायलने पूर्व जेरुसलेम आणि पश्चिम किनारपट्टीवर ताबा मिळवला. हे युद्ध झाल्यानंतर युद्धातील स्थलांतरीतांना पुन्हा घरे देण्यास इस्राइलने नकार दिला. मात्र, गाझा प्रदेशावर सध्या पॅलेस्टीनींचा तर पश्चिम किनारपट्टीवर इस्राइलचा ताबा आहे. मात्र, सध्या इस्त्रायलच्या ताब्यात असलेला जेरुसलेम हा आमचा असल्याचे पॅलेस्टीनी म्हणतात.

1982- या वर्षी पॅलेस्टीनींना हाकलण्यासाठी इस्रायलने लेबॅनॉनवर हल्ला केला.

1993- इस्रायल-पॅलेस्टीनींमध्ये ओस्लो करार झाला. हा करार हमासने अमान्य केला.

2005- या वर्षी इस्रायलने गाझा पट्टीतून माघार घेतली.

दरम्यान, इस्रायलला अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांचे पाठबळ आहे. पॅलेस्टाईनसोबत जगभरातले मुस्लीम राष्ट्र आहेत. या दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत अनेक शांतता चर्चा झाल्या. पण या तोडग्याशिवायच संपल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक शांतताप्रस्ताव तयार केला होता. त्याला शतकातला सर्वात मोठा शांतताप्रस्ताव म्हटलं होतं. हा शांतता प्रस्ताव इस्रायलला मान्य होता. पण पॅलेस्टाईननं तो नाकारला. या संघर्षावर सगळ्या जगानं विचार केला पण दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काही कुणाला सापडला नाही. त्यामुळे आज पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलमध्ये भांडण सुरु असून सध्या ते युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत.

इतर बातम्या :

जाणून घ्या काय आहे आयर्न डोम सिस्टम? ज्यामुळे इस्त्रायल अद्याप सुरक्षित

LIVE Video: इस्त्रायलच्या रॉकेट हल्ल्यात जेव्हा 14 माळ्याची बिल्डींग जमीनदोस्त होते

Video: जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो

(detail information of israel palestine conflict)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.