
हमास आणि त्याच्या सहकारी संघटनांनी गेल्या काही दिवसात तीन व्हिडीओ जारी केले आहेत. जे पाहून प्रत्येकास धक्का बसत आहे. गाझात उपाशी मरणाऱ्या उपाशी लोकांचे फोटो जगभरात पोहचत आहेत आणि लोक दु:खी होत आहेत. परंतू आता हमासचा क्रुर चेहरा सध्या या व्हिडीओत दिसत आहे. ज्यास पाहून थरकाप उडत आहे. या व्हिडीओत २१ वर्षांचा ब्रासलावस्की आणि २४ वर्षांचा एव्यातर डेव्हीड दिसत आहेत. ज्यांचे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यावेळी अपहरण झाले होते.
या व्हिडीओत डेव्हीड स्वत:च आपली कबर खोदताना दिसत आहे. तो इतका कमजोर झाला आहे की त्यांच्या शरीराचा अक्षरश: सापळा दिसत आहे. या व्हिडीओ इस्रायलमध्ये संताप पसरला आहे. या ताज्या व्हिडीओनी इस्रायलमध्ये पुन्हा एकदा युद्ध समाप्त करुन ओलीसांची सुटका करण्यासाठी करार करावा अशी मागणी होऊ लागली आहे. व्हिडीओत दोघे ओलीस इतके अशक्त झालेले दिसत आहेत की त्यांना धड चालताही येत नसल्याचे दिसत आहे.
येथे पाहा पोस्ट –
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या दोन इस्रायली नागरिकांचा व्हिडीओ समोर आल्याने आश्चर्य आणि दुख व्यक्त केले आहे. या व्हिडीओत दोन्ही ओलीस अक्षरश:मेटाकुटीला आलेले दिसत आहेत. नेतान्याहू यांनी या ओलीसाच्या नातेवाईकांनी बोलणी केली आणि त्यांचा सुटकेचा प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचे त्यांना आश्वस्त केले आहे. याच सोबत त्यांनी हमासवर ओलीसांना मुद्दामहून उपाशी ठेवल्याचा आरोप केला आहे. युरोपीय संघाने देखील या व्हिडीओचा निषेध करीत ओलीसांची तातडीने सुटका व्हावी अशी मागणी केली आहे. युरोपीय संघाच्या परराष्ट्र नितीचे प्रमुख काया कैलास यांनी म्हटले आहे की व्हिडीओ हमासची क्रुरता दाखवतात. हमास शस्रे खाली टाकावीत आणि गाझावरील त्यांचे शासन समाप्त व्हावे अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
इस्रायली माध्यमांमध्ये ओलिसांच्या अवस्थेबद्दल मोठ्या प्रमाणात बातम्या येत आहेत. वर्तमानपत्रांनी या व्हिडीओत दिसणाऱ्या डेव्हिडचे उपाशी, कमकुवत आणि हताश असे वर्णन केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही धक्का बसेल. आपल्याला दोन दिवस मुठभर वाटाण्यांवर जिवंत ठेवले जाते असे डेव्हीडने म्हटले आहे. सध्या, गाझामध्ये सुमारे ४९ ओलिस अजूनही हमासच्या कोठडीत आहेत, त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन युद्धबंदीत अनेक ओलिसांची सुटका झाली आहे. दरम्यान, इस्रायलचे कट्टरपंथी मंत्री इटामार बेन गाविर यांनी अल-अक्सा मशीद संकुलाला भेट देऊन पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जॉर्डनने यास निंदनीय पाऊल म्हटले आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे गाझामधील संकट आणि राजकीय तणाव आणखी वाढला आहे.