AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News Live : केडीएमसी मुख्यालयाबाहेर दोन गटात राडा

| Edited By: | Updated on: Dec 11, 2025 | 7:58 AM
Share

नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. इंडिगोची सेवा अजूनही विस्कळीत असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारकडून इंडिगोवर कारवाई केली जाणार आहे.

Maharashtra News Live : केडीएमसी मुख्यालयाबाहेर दोन गटात राडा
Breaking news

नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. याबद्दलची माहिती सभागृहात सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले. यादरम्यान विविध मुद्द्यांवरून सरकारवर अनेक आरोप विरोधकांनी केली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी लागणार आहेत. प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ बघायला मिळत आहे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकमधील तपोवन आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. वृक्षतोडीविरोधात लोक आक्रमक आहेत. सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला थेट विरोध केला. त्यांनी राज ठाकरेंची देखील या संदर्भात भेट घेतली. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. सरकारने इंडिगोवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल काही अपडेट येऊ शकतात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Dec 2025 09:43 PM (IST)

    पारनेर तालुक्यातील किन्हीत  दुसरा बिबट्या देखील वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद 

    पारनेर तालुक्यातील किन्हीत  दुसरा बिबट्या देखील वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

    आज सकाळी एक आणि संध्याकाळी पुन्हा दुसरा बिबट्या झाला जेरबंद

    दोन डिसेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षांच्या महिलेचा झाला होता मृत्यू

    बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये होतं दहशतीचं वातावरण

  • 10 Dec 2025 08:54 PM (IST)

    विरार पश्चिममधल्या विराट नगर परिसरात स्लॅबवरील संरक्षण भिंतीचा कठडा कोसळला

    विरार पश्चिममधल्या विराट नगर परिसरात स्लॅबवरील संरक्षण भिंतीचा कठडा कोसळला

    इमारतीच्या पॅसेजच्या संरक्षण भिंतीचा कठडा खाली असलेल्या दुकानावर कोसळला

    आज रात्री आठच्या सुमारास घडली घटना

    सुदैवानं  या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.

    पोलीस घटनास्थळ दाखल

  • 10 Dec 2025 08:46 PM (IST)

    सांगली शहरात बत्ती गुल, महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरीकांना फटका

    सांगली शहरात बत्ती गुल

    तब्बल दोन तास सांगली शहर अंधारात

    महावितरणच्या भोंगळ कारभाराचा नागरीकांना फटका

    संपूर्ण सांगली शहर 6 पासून रात्री 8 पर्यंत अंधारात

    नागरिकांमधून महावितरणाच्या कारभाराविरोधात संताप

  • 10 Dec 2025 08:27 PM (IST)

    ठाणे रेल्वे कोर्टात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुनावणी

    ठाणे रेल्वे कोर्टात उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे याची सुनावणी होणार आहे.  सकाळी 11 वाजेच्या सुमारास राज ठाकरे रेल्वे कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.  2008 साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता.

  • 10 Dec 2025 07:54 PM (IST)

    जालना : रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

    जालना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्या एका अज्ञाताविरोधात जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री जालना रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची खोटी माहिती एकाने 112 वर कॉल करून दिली होती. मात्र बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाने मध्यरात्री रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॉम्ब अथवा बॉम्ब सुदृश्य वस्तू मिळाली नाही. त्यामुळे खोटी माहिती देणाऱ्या मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहिता 217 नुसार जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 10 Dec 2025 07:40 PM (IST)

    कांदिवली : लैंगिक अत्याचार प्रकरणात भाजपची आक्रमक भूमिका

    कांदिवलीतील 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक प्रकरणात मनसेनंतर आता भाजपनेही उडी घेतली आहे. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आज विधानसभेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. सागर यांनी विशेषत: शताब्दी रुग्णालयातील उपचार प्रक्रियेतील हलगर्जी याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. ‘रुग्णालयात उपचार सुरू असताना झालेल्या दुर्लक्षाला जबाबदार कोण?च असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. यासोबतच, मेडिकल पेपर भरताना लागणाऱ्या विलंबाबाबत ही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुलीच्या जीवापेक्षा कागदपत्रांना अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि संबंधित डॉक्टरांवर तीव्र टीका करत या प्रकरणात सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार योगेश सागर यांनी केली.

  • 10 Dec 2025 07:25 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर : 6 लाख 14 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त

    छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसांची नायलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई केली आहे. ऑनलाईन विक्रीसाठी आणलेला नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मोनो फील्ड गोल्ड नावाच्या कंपनीचे तब्बल 672 गट्टू जप्त करण्यात आले असून याची किंमत 6 लाख 14 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • 10 Dec 2025 07:11 PM (IST)

    केडीएमसी मुख्यालयाबाहेर दोन गटात राडा

    केडीएमसी मुख्यालयाबाहेर दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. टिटवाळा रिंग रोड बाधित उमर मंसूरी व अख्तर इद्रीशी कुटुंब आपसात भिडले होते. मुख्यालयाबाहेर भर रस्त्यात तब्बल अर्धा तास गोंधळ झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पालिका सुरक्षा रक्षकांच्या मध्यस्थीने आता वाद मिटला असला तरी दोन्ही कुटूंबे बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली आहेत.

  • 10 Dec 2025 05:53 PM (IST)

    मध्य प्रदेशातील सागर येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले

    मध्य प्रदेशातील सागर येथील धाना हवाई पट्टीवर एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळले. विमान धावपट्टीवर उलटले आणि त्याचा एक भाग जमिनीवर आदळला. लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. अपघात झाला तेव्हा प्रशिक्षणार्थी वैमानिक विमानात प्रशिक्षण घेत होते.

  • 10 Dec 2025 05:42 PM (IST)

    राहुल गांधी यांनी हरियाणातील अनियमिततेबद्दल संसदेत खोटे बोलले: शाह

    लोकसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी यांनी हरियाणामधील अनियमिततेबद्दल संसदेत खोटे बोलले. त्यांनी संसदीय चर्चेत खोटी माहिती दिली. त्यांनी मत चोरीची कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

  • 10 Dec 2025 05:21 PM (IST)

    बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा- रवी राणा

    बिबट्याबाबत सध्या विधानसभेत रणकंदन माजलं आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे, बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. बिबट्याला पाळल्यास त्याची नसबंदी करण्याची गरज पडणार नाही असं रवी राणा यांनी सांगितलं आहे.

  • 10 Dec 2025 05:08 PM (IST)

    लुथरा ब्रदर्सच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात सुनावणी

    लुथरा बंधूंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे. दोन्ही भाऊ गोवा नाईट क्लब घटनेत आरोपी आहेत. रोहिणी न्यायालयाने त्यांना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला आहे.

  • 10 Dec 2025 02:55 PM (IST)

    आमदार गोगावलेंचा पैशांसोबतचा फोटो दाखवत चित्रलेखा पाटलांचा आरोप

    ‘आमदारांच्या कमिशनमुळे दबलो असं कंत्राटदार म्हणतात” असं म्हणत चित्रलेखा पाटील यांनी आमदार गोगावलेंवर आरोप केला आहे. तसेच आमदार गोगावलेंचा पैशांसोबतचा फोटोही दाखवला आहे.

  • 10 Dec 2025 02:41 PM (IST)

    लाडकी बहिण योजना; बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार : आदिती तटकरे

    विधानसभेत लाडकी बहिणी योजणेवर चर्चा झाली. 2 कोटी 43 लाख लाडक्या बहिणींचं रजिस्ट्रेशन झालं असून बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार असल्याचं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

  • 10 Dec 2025 02:24 PM (IST)

    महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

    महाराष्ट्राच्या खासदारांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील देखील भेटीवेळी उपस्थित होते. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाबद्दल चर्चा करण्यात आली असून याबद्दल लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली.

  • 10 Dec 2025 02:06 PM (IST)

    सोलापुरातील माळशिरसमध्ये अघोरी प्रकारानंतर ग्रामस्थ भयभीत; जळत्या चितेमधील काही अवशेषही गायब

    सोलापुरातील माळशिरस तालुक्यात नातेपुते गावात अघोरी प्रकार समोर आला आहे. जळत्या चितेमधील काही अवशेषही गायब झाल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • 10 Dec 2025 01:55 PM (IST)

    पंढरपूरमध्ये स्मशानभूमीत अघोरी प्रकार

    पंढरपूर येथील नातेपुते स्मशानभूमीत अघोरी प्रकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. काही फोटोंसह काळया बाहुल्या, लिंबू आणि सुया आढळून आल्या आहेत. अघोरी, जादूटोणा प्रकारामुळे नातेपुते गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 10 Dec 2025 01:45 PM (IST)

    पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

    पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे. रुग्णावर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप डॉक्टरांवर करण्यात आला आहे. मृत्यूनंतर रुग्णाच्या मृतदेहाची अवहेलना केल्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 10 Dec 2025 01:30 PM (IST)

    भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊवर्षीय मुलीचा मृत्यू

    पीएमपीएमएलच्या भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊवर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिची गरोदर बहीण गंभीर जखमी झाल्याची वेदनादायक घटना घडली आहे. तळवडे-निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

  • 10 Dec 2025 01:15 PM (IST)

    बिबट्याचे हल्ले ही आपत्कालीन बाब आहे- शरद सोनवणे

    माझ्या विभागात 55 बिबट्यांमुळे बळी गेले. महाराष्ट्राचा बिबट हा आपत्कालीन घोषणा करावा. बिबट्याचे हल्ले ही आपत्कालीन बाब आहे, ग्रामीण भागात शेतामध्ये महिला भगिनी नागरिक सुरक्षित नाही. माणूस मेल्यावर 25 लाख दिले जाते, मात्र माणसाच्या मृत्यूची ही किंमत होऊ शकत नाही. अधिकारी एसीमध्ये बसतात त्यांना बिबट्याची भीती नाही असे आमदार शरद सोनवणे म्हणाले.

  • 10 Dec 2025 12:55 PM (IST)

    पुणे विमानतळावर २.२९ कोटी रुपयांचा गांजा जप्त

    पुणे विमानतळावरून २.२९ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. प्रवाशाच्या बॅगमध्ये २ किलो गांजा साडपला. बँकॉकवरून परतणाऱ्या प्रवाशाकडे अंमली पदार्थ सापडले. पुण्याच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली. एअर इंटेलिजन्स युनिटकडून एका प्रवाशाला अटक करण्यात आली.

  • 10 Dec 2025 12:47 PM (IST)

    जळगावात गुलाबाच्या फुलांच्या दरात मोठी वाढ

    जळगावात गुलाबाच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तब्बल ५०० ते १ हजार रुपये शेकडा अशी गुलाबाच्या फुलांची विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी गुलाबाचे भाव दीडशे रुपये शेकडा होते. मात्र आता तब्बल पाचशे रुपये ते 1 हजार रुपयापर्यंत भाव पोहोचले आहे.

  • 10 Dec 2025 12:32 PM (IST)

    बारामती आणि पुण्यात ईडीचे छापे

    बारामती आणि पुण्यात ईडीने छापे टाकले आहेत. विद्यानंद डेअरीशी संबंधित ईडीची छापेमारी सुरू आहे. पुण्यात २ ठिकाणी तर बारामतीत ३ ठिकाणी ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. आनंद लोखंडे यांच्याशी संबंधित ही छापेमारी आहे. १०८ कोटीची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

  • 10 Dec 2025 12:12 PM (IST)

    चंद्रपुरातील वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम

    चंद्रपूर जिल्ह्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या 14 गावांसंदर्भात तेलंगणाची मुजोरी कायम आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारचा कमकुवतपणाही तसाच आहे. उद्या या भागात ग्रामपंचायत निवडणुका होत असून तेलंगणाने तयारी पूर्ण केली आहे. 14 गावांचा हा प्रश्न 1956 च्या भाषिक राज्य पुनर्रचनेनंतर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाला होता. 1997 साली ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट असल्याबाबत निकाल आला. मात्र तेलंगणा सरकारने या गावांवरचा ताबा सोडला नाही. परिणामी इथली 14 गावे दोन्हीकडे मतदान करतात.

    याशिवाय या चौदा गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या मूलभूत सुविधा उभारल्या गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने वारंवार ही गावी आपलीच असल्याचा दावा केला. यंदाही जुलै 2025 मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बैठक घेत ठोस भूमिका घेतली. मात्र तरीही उद्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारचे दावे फोल ठरल्याचे दिसत आहे.

  • 10 Dec 2025 11:59 AM (IST)

    बदनापूर ते चिखली मार्गावर तयार करण्यात आलेला रस्त्याचा प्लांट स्थलांतरित करा – गावकऱ्यांची मागणी

    जालना जिल्ह्यातल्या बदनापूर ते चिखली या मार्गाचं काम मागच्या काही महिन्यांपासून अतिशय हळू सुरू आहे. दनापूर तालुक्यातल्या कंडारी बुद्रुक या ठिकाणी सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी कंत्राट दाराने अत्याधुनिक मशीनरीसह मोठा प्लांट उभा केला आहे. त्या मधून केमिकल युक्त धूर निघत असल्याने शेतीपिकांना फटका बसू शकतो, अस गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कंत्राटदाराच्या विरोधात हे गावकरी आता आक्रमक झाले असून हा प्लांट इचर ठिकाणी हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

  • 10 Dec 2025 11:34 AM (IST)

    कोंढवा जमीन गौरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता

    कोंढवा जमीन गौरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांची 1 डिसेंबरला चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 10 तारखेला पुन्हा  चौकशीला हजर राहीन, असं दिग्विजय पाटील यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.  पण पोलिसांचा अद्याप दिग्विजय पाटील यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 10 Dec 2025 11:23 AM (IST)

    विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यात धुसफूस

    विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून काँग्रेस आणि ठाकरे सेना यांच्यातच वाद झाला. विधीमंडळात ठाकरेंच्या 20 पैकी 14 आमदारांची बसण्यासाठी पुढील जागेत व्यवस्था आहे. मात्र ठाकरेंच्या कनिष्ठ आमदारांमुळे ज्येष्ठ आमदारांना मागे बसावं लागत असल्याची काँग्रेसची तक्रार होती. यानंतर  काँग्रेसच्या 6 आमदारांची पुढे बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

  • 10 Dec 2025 11:15 AM (IST)

    सांगली – जतमध्ये भानामतीचे धक्कादायक प्रकार समोर, शहरात खळबळ

    नगरपरिषद निवडणुकानंतर करणी भानामतीचे प्रकार विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत. सांगलीच्या जतमध्ये करणीभानामतीचा प्रकार समोर आला आहे. त नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या बाबतीत ही करणी भानातमी केल्याचे उघड झाले. यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • 10 Dec 2025 10:57 AM (IST)

    हॉटेल मालक आणि वेटरकडून ग्राहकाला मारहाण

    जेवण करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना हॉटेलचे वेटर आणि हॉटेल मालकांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली. पुण्याजवळील मांजरी येथील हॉटेल हॅप्पी पंजाब येथील धक्कादायक घटना. आशिष भगत आणि त्याच्या मित्राला हॅप्पी पंजाबच्या वेटर आणि मालकाने केली बेदम मारहाण

  • 10 Dec 2025 10:46 AM (IST)

    महेंद्र दळवी हे थोर विचारवंत – सुनील तटकरे

    महेंद्र दळवी हे थोर विचारवंत आहेत. एवढ्या महान व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे. उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. सुनील तटकरेंची खोचक टीका

  • 10 Dec 2025 10:24 AM (IST)

    नागपूरच्या पारडीमध्ये बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं

    नागपूरच्या पारडीमध्ये बिबट्यामुळे भितीचं वातावरण. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं.

  • 10 Dec 2025 10:06 AM (IST)

    बीड जिल्ह्यात भूजल पातळी कितीने वाढली?

    दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात या वर्षी गत पाच वर्षाच्या तुलनेत भूजल पातळी 1.75 मीटरने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात नोंद केलेल्या भूजल निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. यंदा बीड जिल्ह्यात दिडशे टक्के इतका पाऊस झाला असून त्यात अतिवृष्टीची देखील नोंद आहे.

  • 10 Dec 2025 09:57 AM (IST)

    अमरावती जेलमधील मोबाईल प्रकरणात मोठा खुलासा; 6 मोबाईलमध्ये 60 सिमकार्डचा वापर

    अमरावती मध्यवर्ती कारागृहातील मोबाईल प्रकरणात नवीन आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अंडा सेलमध्ये तीन दोषी कैद्यांकडून जप्त केलेल्या 6 मोबाईल फोनमध्ये तब्बल 60 सिमकार्डचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अन्य कैद्यांचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत सुमारे 60 जणांचे जबाब नोंदवले असून, पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आहे. जप्त केलेल्या मोबाईल डेटाचा सखोल तपास सुरू आहे, ज्यामुळे लवकरच या संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

  • 10 Dec 2025 09:43 AM (IST)

    पंढरपुरात 21 ते 31 डिसेंबर दरम्यान विठ्ठलाचे व्हीआयपी, ऑनलाईन दर्शन बंद

    नाताळच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत श्री विठ्ठलाचे व्हीआयपी (VIP), ऑनलाईन आणि टोकन दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सुट्टीच्या या कालावधीत जवळपास चार ते पाच लाख भाविक पंढरपूरमध्ये येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.

  • 10 Dec 2025 09:31 AM (IST)

    नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई; 5 जणांना अटक

    छत्रपती संभाजीनगर येथे नायलॉन मांजामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा कापून जखमी झाली होती.  पोलीस आयुक्तांनी मांजा विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार, शहर पोलिसांनी जीवघेण्या नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कंबर कसली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 मांजा विक्रेत्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 206 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त केले आहेत.  या अटक करण्यात आलेल्यांमध्ये काफिलउल्ला खान फजलउल्ला खान, शेख मुशीर अहमद अश्फाक अहमद, शेख फरदीन अब्दुल रज्जाक, तालेबखान शेरखान, मुद्दशीर उर्फ मुजीब अहमद नजीर अहमद यांचा समावेश आहे. नायलॉन मांजा शहराबाहेरही विकला गेला आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

  • 10 Dec 2025 09:24 AM (IST)

    पुण्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी घट, चिकनगुनिया, मलेरियाही नियंत्रणात

    पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळा संपल्यामुळे शहरातील डेंग्यूची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन महिन्यांत डेंगीच्या संशयित आणि निश्चित निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्णही कमी झाले आहेत. सर्वेक्षण, धूर फवारणी आणि जनजागृती या उपाययोजनांचा फायदा झाल्यामुळे ही संख्या घटल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

  • 10 Dec 2025 09:11 AM (IST)

    अधिवेशन काळात नागपुरातील अवैध राजकीय होर्डिंग तातडीने हटवण्याचे आदेश

    नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शहरातील अवैध राजकीय होर्डिंग्ज त्वरित हटवण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिले आहेत. नेत्यांच्या मनमानी वागणुकीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात ठिकठिकाणी नेत्यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स, बॅनर्स आणि फ्लेक्स लागले आहेत, ते तातडीने हटवण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात लावलेल्या या होर्डिंग्जमुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे येत आहेत. आता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

  • 10 Dec 2025 09:03 AM (IST)

    नागपुरात बिबट्याची दहशत, परिसरात भीतीचं वातावरण

    नागपुरातील पारडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी भागात दिसलेल्या याच बिबट्याने आज पहाटे दोन किंवा अधिक लोकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

  • 10 Dec 2025 08:50 AM (IST)

    मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात आदिवासी विकास मंत्र्यांसोबत बैठक

    मका खरेदीच्या मागणीसाठी पायी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्र्यांनी बोलावले. मका पिकाला प्रतिक्विंटल 2400 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत मिळावी यासाठी परतवाडा ते नागपूर असा 180 किलोमीटर होता पायदळ प्रवास. 8 तारखेला अमरावतीच्या परतवाडा येथून शेकडो आदिवासी बांधव आणि शेतकरी नागपूर हिवाळी अधिवेशनावर पायदळ निघाले होते.

  • 10 Dec 2025 08:40 AM (IST)

    इंडिगोची 12 विमाने रद्द, पुण्यातील प्रवाशांना मनस्ताप

    पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर रद्द होणारे विमानांचे परिस्थितीमध्ये सुधारणा होत असून. मंगळवारी पुण्यात येणारी पाच आणि पुण्यातून जाणारे सात अशी बारा विमाने रद्द झाली. रद्द होणाऱ्या विमानांची माहिती काही तास अगोदर दिल्यामुळे प्रवाशांना नियोजन करण्यास वेळ मिळाला

  • 10 Dec 2025 08:35 AM (IST)

    महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ

    मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज. महापालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपता संपेना अशी परिस्थिती. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने दिला. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही २२ डिसेंबर होती. ही मुदत आता २७ डिसेंबर केली आहे.

  • 10 Dec 2025 08:30 AM (IST)

    इंडिगोला उड्डाणकपातीचे आदेश, केंद्रीय मंत्र्यांचे कठोर कारवाईचे संकेत

    सुरक्षा नियमांचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने देशभरातील हजारो उड्डाणे रद्द. इंडिगोच्या उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना विमान कंपनीच्या व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात बोलावण्यात आले

  • 10 Dec 2025 08:20 AM (IST)

    बदलापुरात बिबट्याची मोठी दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    आंबेशीव गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची धावाधाव. बिबट्यामुळे नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

  • 10 Dec 2025 08:16 AM (IST)

    त्रंबकेश्वर घोटी येथील मुले विक्रीचा संशय पोलीस संशयित दांपत्याच्या घरी

    परिस्थिती हलकीची असल्याने 14 मुलांपैकी सहा जण विकल्याचा संशय. यासंदर्भातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाचे सर्कल महिलेच्या घरी. संशयित दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात असल्याची प्राथमिक माहिती. भरड्याची वाडी या ठिकाणी एका वस्तीत राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने पोटच्या मुलांना विकल्याचा घडला होता धक्कादायक प्रकार.

Published On - Dec 10,2025 8:14 AM

Follow us
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.