AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Irani : जर, तुम्ही हिंसाचार करण्यास सक्षम नसाल, तर…धुरंधर पाहिल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया

Smriti Irani : सध्या आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान हिट ठरला आहे. दिवसागणिक या चित्रपटाच्या चाहत्यांची वाढ होत आहे. यात आता माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांचा समावेश झाला आहे. त्यांनी धुरंधरवर प्रतिक्रिया दिली आहे.

Smriti Irani : जर, तुम्ही हिंसाचार करण्यास सक्षम नसाल, तर...धुरंधर पाहिल्यानंतर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया
Smriti Irani-Ranveer Singh
| Updated on: Dec 10, 2025 | 8:24 AM
Share

सध्या सगळीकडे आदित्य धरच्या धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाल केली आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने 150 कोटी कमाईचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित रिल्सनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त अशी मल्टीस्टारर स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. अक्षय खन्नाच्या अभियनाचं विशेष कौतुक होत आहे. त्याने रंगवलेला रेहमान डकैत हा गँगस्टर प्रेक्षकांना प्रचंड भावला आहे. त्याशिवाय एक बहरीनी गाण्यावर त्याने काही डान्स स्टेप केल्या आहेत. त्या तुफान लोकप्रिय झाल्या आहेत. इन्स्टाग्रामवर या डान्स स्टेपवरुन अनेक रिल्स बनवल्या जात आहेत. 2025 सरता-सरता बॉलिवूडला धुरंधरच्या रुपाने एक मोठा हिट चित्रपट मिळाला आहे.

धुरंधर चित्रपट पाहून येणारे प्रेक्षक स्वत: समीक्षक बनले आहेत. हा पिक्चर कसा आहे, त्याच्या वर्णनाचे व्हिडिओ ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आहे. धुरंधर चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आता अभिनेत्री आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा देखील समावेश झाला आहे. धुरंधर पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी खास सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी शांतता आणि हिंसाचार या दोन शब्दांचा वापर केला आहे.

स्मृती इराणी यांनी काय म्हटलय?

स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करुन रणवीर सिंहच्या धुरंधरच कौतुक केलं आहे. ‘जर, तुम्ही हिंसाचार करण्यास सक्षम नसाल, तर स्वत:ला शांतताप्रिय ठरवू नका’ असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. कॅप्शनच्या शेवटी फायरचा इमोजी टाकला असून हॅशटॅग धुरंधर लिहिलं आहे. चित्रपटाला थिएटरमध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. रणवीर सिंहने या चित्रपटात भारतीय हेर साकारला आहे. पाकिस्तानात कराची शहरामध्ये ल्यारी नावाचा भाग आहे. तिथल्या स्थानिक गँगवॉरला केंद्रस्थानी ठेऊन एक भारतीय हेर कशा पद्धतीने काम करतो ते या चित्रपटातून दिग्दर्शक आदित्य धरने मांडलं आहे. सारा अर्जुनने या चित्रपटातून डेब्यु केला आहे. खऱ्याखुऱ्या घटनांवर हा चित्रपट आधारिक आहे असं म्हटलं जातं.

अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर
अपघातात अजित पवार यांचा मृत्यू, रूपाली ठोंबरेंना अश्रु अनावर.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!
अजित पवारांच्या मृत्यूनंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट!.
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार
अजित पवारांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगणात ठेवण्यात येणार.
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत
अजित पवार अकाली निधन; शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत.