AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंब विखुरलं ? आता हेमा मालिनी घेणार वेगळी शोक सभा, सनी, बॉबी देओल जाणार का?

अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबातील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. मुंबईतील शोकसभेत हेमा मालिनी अनुपस्थित होत्या. आता हेमा मालिनी यांनी वृंदावन येथे धर्मेंद्र यांच्यासाठी दुसरी शोकसभा आयोजित केली आहे. या शोकसभेत सनी आणि बॉबी देओल हे दोघे उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता आहे. यामुळे देओल कुटुंबात दुफळी निर्माण झाल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंब विखुरलं ? आता हेमा मालिनी घेणार वेगळी शोक सभा, सनी, बॉबी देओल जाणार का?
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी दुसरी शोकसभा आयोजित केली आहेImage Credit source: social media
| Updated on: Dec 10, 2025 | 8:13 AM
Share

अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. धर्मेंद्र आजारी असताना पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र आलं होतं. धर्मेंद्र यांची पहिली बायको प्रकाश कौर आणि दुसरी बायको हेमा मालिनी या दोघीही धर्मेंद्र यांच्या अखेरच्या काळात त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे देओल कुटुंब अखेर एकत्र झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अनेकांना हे चित्र पाहून हायसंही वाटलं होतं. पण धर्मेंद्र यांच्या शोक सभेत मात्र वेगळच चित्र दिसलं. मुंबईत झालेल्या या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली दिसल्या नाहीत. यावरून देओल फॅमिलीत बेबनाव कायम असल्याचं दिसून आलं होतं.

धर्मेंद्र यांची पहिली शोकसभा पार पडलेली असतानाच आता हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांची दुसरी शोकसभा आयोजित केली आहे. वृंदावन येथे या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संत समाजाकडून यावेळी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हेमा मालिनी या मथुराच्या खासदार आहेत. त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करून या दुसऱ्या शोकसभेची माहिती दिली आहे. या शोकसभेला बॉबी आणि सनी देओल जाणार की नाही याची माहिती नाही. पण दुसरी शोकसभा घेण्यात आल्याने देओल कुटुंब विखुरलं असल्याची चर्चा होत आहे.

संत समाज देणार श्रद्धांजली

13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. वृंदावन येथील छटीकारा रोडवरील श्रीकृष्ण जन्माष्टमी आश्रमात या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांचं ब्रजभूमीशी वेगळं नातं होतं. या ठिकाणी त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आणि त्यांना श्रद्धा सुमन आर्पित करण्यासाठी या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शोकसभेला धर्मेंद्र यांचे चाहते, स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक आणि संत समाज धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करेल, असं हेमा मालिनी यांनी म्हटलंय.

मुंबईतील शोकसभेला अनुपस्थित

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेला हेमा मालिनी, ईशा आणि अहाना देओल उपस्थित राहिल्या नव्हत्या. या शोकसभेला बॉलिवूडमधील जवळपास सर्व कलाकार उपस्थित होते.

म्हणून घेतला निर्णय

धर्मेंद्र यांचं ब्रजभूमीवर अतोनात प्रेम होतं. त्यामुळेच हेमा मालिनी यांनी वृंदावनमध्ये श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रजवासींकडूनही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली जावी हा त्यामागचा हेतू आहे.

Follow Us
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार