
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वयाबाबत आता मोठा खुलासा करण्यात आला. त्यांच्या आरोग्याबाबत वैद्यकीय अहवाल पुढे आलाय. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्य रिपोर्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत काही खुलासे करण्यात आली आहेत. व्हाईट हाऊसचे डॉक्टर शॉन बार्बेबेला यांनी मोठी अपडेट शेअर केली. डोनाल्ड ट्रम्प यांचे सध्या वय 79 आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेणारे ते सर्वाधिक वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे वय जरी जास्त असले तरीही त्यांच्या वयापेक्षा जास्त हृदय चांगले काम करते. शिवाय त्यांचे शरीर वयापेक्षा खूप जास्त कमी असल्याचे दिसतंय. सर्व अवयव चांगल्याप्रकारे काम करतात.
डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले की, शारीरिक कार्यक्षमता ट्रम्प यांची अत्यंत चांगली असून हृदय, रक्तवाहिन्या, मज्जासंस्था सर्वकाही व्यवस्थित काम करत आहे. डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही दाैऱ्यावर जाण्याच्या अगोदर त्यांच्या सर्व चाचण्या केल्या जातात. रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हृदयाचे वय अंदाजे 14 वर्षांनी कमी असल्याचे आढळून आले. ट्रम्प यांची वैद्यकीय तपासणी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटर येथे झाली.
वैद्यकीय तपासणीत हे देखील स्पष्ट झाले की, ट्रम्प यांचे कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणात आहे. दररोज ट्रम्प त्यांच्या डाएटचे फॉलो करतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाण्यापिण्याचा संपूर्ण वेळा ठरलेला आहेत. शिवाय विदेश दाैऱ्यावर ते असतील तर अगोदरच सर्व गोष्टींची तयारी केली जाते. डोनाल्ड ट्रम्प काय खातात काय पितात यावर त्यांच्या पथकाचे बारीक लक्ष असते.
आता आलेल्या रिपोर्टनुसार, वैद्यकीय चाचणीत त्यांचे वय 14 कमी दाखवत आहेत. म्हणजेच त्यांचे शरीर, हृदय पूर्णपणे फीट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल घेतलेल्या निर्णयानंतर जगात खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. भारतानंतर चीनवरही त्यांनी मोठा टॅरिफ लावलाय. अमेरिकेत आयात होणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर ते मोठा टॅरिफ लादताना दिसत आहेत. यामुळे जगात मोठी खळबळ उडाली आहे. चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे.