AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, तडकाफडकी बंदीचा आदेश काढला; काय घडलं?

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी या कारवाईबाबात अधिक माहिती दिली आहे. या कंपन्यांचे नेटवर्क सुडानी सशस्त्र बल, रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांना शस्त्र, स्फोटकं, परदेशी लढाई जवान यांचा पुरवठा करत होते, असा दावा अमेरिकेने केला आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा दणका, तडकाफडकी बंदीचा आदेश काढला; काय घडलं?
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 27, 2026 | 3:55 PM
Share

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतासही जगातील इतरही काही देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इराणवर हल्ला केल्यामुळे मोठे युद्ध पेटले. इराण-अमेरिका युद्धामुळे संपूर्ण जग महागाईत होरपळले. मेक अमेरिका ग्रेट अगेन या धोरणाअंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक धक्कादायक निर्णय घेतलेले आहेत. दरम्यान, त्यांनी आता नुकतेच एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी एका भारतीय कंपनीसह त्या कंपनीचे सिईओ तसेच अनेय काही संस्थांवर बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने एका भारतीय कंपनीवर तसेच त्या कंपनीच्या सीईओ यांच्यावर बंदी घातली आहे. भारतीय कंपनीच्या सीईओसह अन्य आठ लोकांवर तसेच काही संस्थांवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. या संस्थांनी सुडानमध्ये सस्त्रं, स्फोटकं पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शस्त्रपुरवठ्यामुळे गृहयुद्धाला चालना मिळाली, असेही मत अमेरिकेने व्यक्त केले आहे.

अमेरिकेने नेमका काय दावा केला?

मेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने याबाबतची माहती जारी केली आहे. ज्या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे, त्या संस्थांमुळे सुडानी सशस्त्र दल, रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांना बळ मिळालेले आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.

दहशतवादी शक्तींना काम करण्याची संधी मिळाली

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी या कारवाईबाबात अधिक माहिती दिली आहे. या कंपन्यांचे नेटवर्क सुडानी सशस्त्र बल, रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांना शस्त्र, स्फोटकं, परदेशी लढाई जवान यांचा पुरवठा करत होते. या कंपन्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांना बळ मिळालेले आहे. दहशतवादी शक्तींना काम करण्याची संधी मिळाली आहे, असे टॉमी पिगॉट यांनी सांगितले आहे. सुडानच्या सशस्त्र बल विभाग आणि शस्त्रांची देखभाल करणाऱ्या कंपनीला संबंधित भारतीय कंपनीने स्फोटकं आणि त्यासंबंधीची माहिती सामग्री पोहोचवल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. दरम्यान, आता या प्रकरणात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान