डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, अमेरिकेत उडाला हाहाकार, संपूर्ण देश ठप्प, जगभरात खळबळ

अमेरिकेनं भारतासह अनेक देशांवर प्रचंड प्रमाणात टॅरिफ लावला आहे, टॅरिफच्या माध्यमातून भारताला वेठीस धरून पहाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता मोठा दणका बसला आहे, ज्यामुळे संपूर्ण अमेरिका ठप्प झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का, अमेरिकेत उडाला हाहाकार, संपूर्ण देश ठप्प, जगभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2025 | 8:51 PM

अमेरिकेनं भारतासह अनेक देशांवर प्रचंड प्रमाणात टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफसह तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. मात्र त्यानंतर आता अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी कामकाज पुन्हा एकदा ठप्प झालं आहे, सरकारने अधिकृतपणे शटडाऊनची घोषणा केली आहे. 2018 ला देखील अमेरिकेनं शटडाऊनची घोषणी केली होती, विशेष म्हणजे तेव्हा देखील डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे अध्यक्ष होते. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आणण्यात आलेल्या निधी विधेयकावर एकमत न झाल्यानं शटडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

अमेरिकेमध्ये शटडाऊनची घोषणा झाल्यामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा भूकंप आला आहे. लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय रजेवर पाठवलं जात आहे, तर काही लोकांना थेट कामावरून काढून टाकलं जात आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असून, एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, दरम्यान हा ट्रम्प यांच्यासाठी त्यांच्या विरोधकांकडून देण्यात आलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, जर निधी विधेयकावर एकमत झालं नाही तर माझ्याकडे सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये, डेमोक्रॅट्सने खुल्या सीमा धोरणाचा स्वीकार केला आणि बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिले म्हणून हे आज सर्व घडत आहे, असा आरोपीही यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या शटडाउनचा सर्वात मोठा परिणाम हा अमेरिकेतली सरकारी संस्था आणि सेवांवर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष असताना 2018 मध्ये देखील शटडाऊनी घोषणा करण्यात आली होती, तब्बल 34 दिवस शटडाऊन चालला, त्यावेळी आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमावावी लागली होती. त्यानंतर आता काय निर्णय होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सर्वाधिक शिक्षण क्षेत्रात कपात 

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शटडाऊनची घोषणा करताच याचा सर्वाधिक परिणाम हा तेथील शिक्षण विभागावर झाला आहे. जवळपास 87 टक्के कर्मचाऱ्यांना बिना पगारी सक्तीच्या सुट्ट्या देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.