भारत सर्वात मोठ्या संकटात, ट्रम्प यांच्या निर्यामुळे पुढच्या दोन महिन्यात…नेमकं काय होणार?

अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आता भारत मोठ्या संकटात सापडला आहे. तेल खरेदीबाबत भारतापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

भारत सर्वात मोठ्या संकटात, ट्रम्प यांच्या निर्यामुळे पुढच्या दोन महिन्यात...नेमकं काय होणार?
donald trump and narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 9:03 PM

Russian Oil Supply : आपला व्यापार वाढावा आणि रशियाची कोंडी व्हावी यासाठी अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. रशियातील रॉसनेफ्ट आणि लुकॉईल या दोन तसेच या कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. 21 नोव्हेंबर रोजीपासून अमेरिकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच भारत तसेच इतरही जगभरातील देशे या दोन कंपन्यांकडून कच्च्या तेलाची आयात करू शकत नाहीयेत. याच कारणामुळे आता भारत अडचणीत सापडला आहे. आगामी काळात कच्च्या तेलाच्या पूर्ततेबाबत भारतापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

21 नोव्हेंबरपासून निर्बंध लागू

भारताने या वर्षी रशियाकडून सरासरी 17 लाख बॅरल प्रतिदिन या हिशोबाने कच्च्या तेलाची आयात केलेली आहे. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 18 ते 19 बॅरल प्रतिदिन राहण्याची शक्यता व्यक्त केलीजात आहे. असे असताना 21 नोव्हेंबरपासून अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळेच भविष्यात डिसेंबर आणि जानेवारी 2026 मध्ये या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. ही घट साधारण 4 लाख बॅलर प्रतिदिनपर्यंत असू शकते.

भारताची रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यानंतर पश्चिमी देशांनी रशियावर बंधनं लादली. या काळात म्हणजेच फेब्रुवारी 2022 पासून भारताने मात्र रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी केली. रशिया भारताला कमी किमतीत तेल देत असल्याने या काळात भारताने जोमात तेल खरेदी केलेली आहे. परंतु आता अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावर बंधनं येणार आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

रशियाने भारताला तेल स्वस्तात विकलं

युक्रेनसोबत युद्ध चालू असल्याने पश्चिमी आणि युरोपीय देशांनी रशियावर निर्बंध लादले. त्यामुळे रशियाला भारतातील बाजारपेठ खुणावू लागली. भारताला आकर्षित करण्यासाठी रशियाने कच्च्या तेलावर मोठी सुट दिली. त्यामुळेच भारताचे रशियाकडून तेल आयातीचे प्रमाण एक टक्क्याहून तब्बल 40 टक्क्यांपर्यंत वाढले. नोव्हेंबर महिन्यातदेखील रशियाच भारताला सर्वाधिक तेल विक्री करणारा देश ठरला. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचपीसीएल मित्तल एनर्जी आणि मँगलोर रिफायनरी यासारख्या कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवलेले आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या निर्बंधानंतर चित्र वेगळे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना भारत यावर नेमका काय पर्याय शोधणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.