टॅरिफ दबावामध्ये सर्वात मोठी गुडन्यूज, आता जगभरात भारताचा डंका, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, या टॅरिफचा भारताच्या जीडीपीवर परिणाम होईल असं वाटत असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, भारतासाठी गुडन्यूज समोर आली असून, अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफचा प्रभाव हा देशाच्या जीडीपीवर पडू शकतो असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र भारतानं हे सर्व अंदाज चुकीचे ठरवत जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेनं लावलेला टॅरिफ आणि सध्या जागतिक बाजारपेठेत सुरू असलेल्या प्रचंड उलथापालथीनंतर देखील भारताला मोठ यश मिळालं आहे. भारत जगात सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रथम क्रमाकांवर पोहोचला आहे. वर्ल्ड बँक आणि आयएमएफ सारख्या संस्थांकडून तर यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंच आहे, आता या संदर्भात हार्वर्डच्या दिग्गज अर्थतज्ज्ञांकडून देखील एक चार्ट शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या यादीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक असल्याचं दिसून येत आहे.
कोरोना काळामध्ये भारतासह जगातील सर्वच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता, मात्र यातून आता भारतानं झपाट्यानं कमबॅक केल्याचं दिसून येत आहे, भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. भारतानं चीन, अमेरिका, रशिया सारख्या देशांना याबाबतीमध्ये मागे टाकलं आहे. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था एवढ्या वेगानं वाढली नसल्याचं समोर आलं आहे. हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावून देखील भारताच्या निर्यात क्षेत्रानं मोठी उसळी घेतली आहे. टॅरिफनंतर भारताची निर्यात कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात होती, मात्र हा अंदाजही भारतानं चुकीचा ठरवला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये भारताची निर्यात तब्बल दोन टक्क्यांपेक्षाही जास्त वाढली आहे, विशेष म्हणजे अमेरिकेसोबतच्या निर्यातीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे, दरम्यान हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे भारतानं आता अमेरिकेला पर्याय म्हणून इतर देशांसोबत देखील आपले संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली आहे, याचाच एक भाग म्हणून भारतानं चीनी पर्यटकांसाठी नव्या व्हिसा पॉलिसीला परवानगी दिली आहे, नव्या व्हिसा धोरणानुसार आता चीनी पर्यटकांना जगातील कोणत्याही ठिकाणाहून भारतीय दूतावासाच्या माध्यमातून व्हिसासाठी अर्ज करता येणार आहे.
