दिसते 23ची पण खरं वय आहे… , Ivanka Trump यांचा फिटनेस मंत्र काय ? डोनाल्ड ट्रम्प यांची लेक चर्चेत

Ivanka Trump Fitness Routine: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प या आपल्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. वयाच्या 43 व्या वर्षीही इवांका या खूप तरुण दिसतात. तुम्ही त्यांना अगदी 23 वर्षाच्या देखील म्हणू शकतात. चला जाणून घेऊया त्यांचा फिटनेस मंत्र.

दिसते 23ची पण खरं वय आहे... , Ivanka Trump यांचा फिटनेस मंत्र काय ? डोनाल्ड ट्रम्प यांची लेक चर्चेत
इवांका ट्रम्प
| Edited By: | Updated on: Feb 03, 2025 | 10:31 AM

Ivanka Trump Fitness Routine: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्याचवेळी त्यांचे कुटुंबीय, विशेषत: त्यांची मुलगी इवांका ट्रम्प सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. इवांका या त्यांच्या फिटनेस आणि सुंदर स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. वयाच्या 43 व्या वर्षी देखील इवांका ट्रम्प 23 वर्षांच्या दिसतात.  इवांका ट्रम्प यांचा आहार आणि सौंदर्यांच रहस्य जाणून घेऊया या लेखातून

कोण आहेत इवांका ट्रम्प?

इवांका ट्रम्प या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी मुलगी आहे. इवांका ट्रम्प या बिझनेसवुमन आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात इवांका ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांच्या वरिष्ठ सल्लागार होत्या. इवांका ट्रम्प त्यांच्या करिअर आणि लूकमुळे अनेकदा चर्चेत राहिल्या आहेत आणि अजूनही त्या नेहमी चर्चेत असतात.

3 मुलांची आई फिटनेसमध्ये तरुणींना लाजवते

43 वर्षीय इवांका 3 मुलांची आई आहेत, त्यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. इवांका आपल्या दिवसाची सुरुवात फिट राहण्यासाठी वर्कआऊटने करतात. वर्कआऊटमध्ये त्या योगा, कार्डिओ करतात. याशिवाय त्या वेट लिफ्टिंग आणि रेझिस्टन्स ट्रेनिंगही करतात. इवांका रोज 20 मिनिटे वर्कआउट करतात.

इवांकाचा आहार काय ?

इवांका आठवड्यातून 4 दिवस वर्कआऊट करतात. त्यांच्या जेवणात 30 ते 40 ग्रॅम प्रथिने असतात. इवांका सकाळी 5.30 वाजता उठतात, त्या रोज मेडिटेशन करतात. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पितात.

इवांका रोज सकाळी लिंबूपाणी पितात

इवांका रोज सकाळी लिंबूपाणी पितात. नाश्त्यात कॉटेज चीज किंवा ग्रीक दहीसह ब्लूबेरी घेतात. इवांका ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे, शेंगदाणे खातात.

इवांका रात्रीच्या जेवणात काय खातात?

फिटनेससाठी इवांका आपला डाएट आणि वर्कआऊट संतुलित ठेवतात. रात्रीच्या जेवणात त्या ग्रीन कोशिंबीर, घरगुती व्हेजिटेबल सूप, प्रोटीन यांचे सेवन करतात. याशिवाय त्या संपूर्ण धान्य आणि ओट्स खातात.

इवांका या डोनाल्ड आणि दिवंगत इव्हाना ट्रम्प यांचे दुसरे अपत्य आहे. इवांका यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1981 रोजी झाला. इव्हांका मेरी ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील क्राइस्ट चर्च आणि चॅम्पियन स्कूलमधून शिक्षण घेतले. यानंतर ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाल्या. इवांका ‘द अप्रेंटिस’मध्ये जज आणि मॉडेल देखील आहे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)