चीनमधून निघताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह शिष्टमंडळाने घेतला धक्कादायक निर्णय, थेट कचरापेटीतच..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर होते. यादरम्यान काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. तब्बल 9 वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर पोहोचले होते. आता या दाैऱ्याबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

चीनमधून निघताच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह शिष्टमंडळाने घेतला धक्कादायक निर्णय, थेट कचरापेटीतच..
Donald Trump delegation
| Updated on: May 16, 2026 | 7:44 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तब्बल 9 वर्षानंतर चीनच्या दाैऱ्यावर गेले. डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दाैरा संपला आहे. मात्र, यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शिष्टमंडळाने चीनमधून निघताना त्यांच्या विमानात बसण्यापूर्वीच सर्व मोबाईल, लॅपटॉप, हेडफोन आणि जवळपास सर्वच गोष्टी फेकून दिल्या. फक्त हेच नाही तर चीनकडून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आलेले सर्व गिफ्ट त्यांनी विमानात बसण्यापूर्वीच फेकून देत नष्ट केली. चीन हे जगातील सर्वात हेरगिरीकरिता धोकादायक ठिकाण आहे. अमेरिकन शिष्टमंडळातील जवळपास सदस्यांनी चीनला जाण्यापूर्वी आपले मुळ फोन, लॅपटॉप अमेरिकेतच ठेवली होती. चीन दाैऱ्यापूर्वी त्यांना नवीन फोन देण्यात आली, ज्यात काहीच डेटा नव्हता. फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या सर्व शिष्टमंडळाने विमानात बसण्यापूर्वीच चीनच्याच हद्दीत सर्व गोष्टी फेकून देत नष्ट केल्या.

सायबरसुरक्षेसाठी चीन सर्वात धोकादायक ठिकाण आहे. हेरगिरी, हॅकिंग डेटाचा सर्वात मोठा धोका चीनमध्ये आहे. याकरिता अमेरिकेकडून पुरेपुर काळजी घेण्यात आली. हेच नाही तर चीनकडून ज्याकाही भेटवस्तू अमेरिकेत घेऊन जाण्याकरिता शिष्टमंडळाला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आल्या होत्या, त्या देखील विमानात चढण्यापूर्वीच डसबिनमध्ये फेकण्यात आल्या.

अमेरिकेला एक टक्क्याचाही विश्वास चीनवर नाही. शिवाय कोणत्याही पद्धतीमध्ये त्यांना त्यांच्या सुरक्षेमध्ये तडजोड करायची नाही. चीनमध्ये असे काही तंत्रज्ञान आहेत, जे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप हॅक करतात आणि जोपर्यंत तो मोबाईल किंवा लॅपटॉप सुरू आहे, तोपर्यंत डेटा पुरवतात. यामुळेच अमेरिकेच्या शिष्टमंडळाने आपले मुळ मोबाईल आणि लॅपटॉप चीानमध्ये आणलेच नाहीत, ज्यात कोणत्याही प्रकारचा डेटा आहे.

सर्वकाही नवीन घेऊन आले आणि तेही चीनच्या हद्दीत फेकून दिले आणि नष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा होत्या. व्यापार, सुरक्षा आणि इराण युद्धात या दाैऱ्यात चर्चा झाली. काही गोष्टींवर चीन आणि अमेरिकेत एकमत झाले. मात्र, चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर काही गोष्टींवर खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. काही मोठ्या घोषणाही यादरम्यान करण्यात आल्या.

Follow Us