Vastu Shastra : तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात का? त्यामागे असू शकतात ही तीन कारणं
स्वप्नशास्त्र हा देखील एक स्वतंत्र विषय आहे, तुम्हाला झोपेत दररोज चांगली, वाईट स्वप्न पडत असतात. या प्रत्येक स्वप्नांचा आपण आपल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. याच सर्व गोष्टी या स्वप्नशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.

तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्हाला स्वप्न का पडतात? तर त्याचं कारण सोपं आहे. तुम्ही दिवसभर जो विचार करत असतात, एखादी गोष्ट ही अशीच झाली पाहिजे, असं तुम्हाला मनातून वाटत असतं, त्या गोष्टी रात्री तुमच्या स्वप्नात येऊ शकतात. अशा स्वप्नांना फार काही अर्थ नसतो. परंतु अनेकदा अशी देखील काही स्वप्न पडतात, जी विशिष्ट संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात. जर अशी स्वप्न तुम्हाला वारंवार पडत असतील तर तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे, हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. अनेकदा आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी राहण्यासाठी जातो किंवा नवीन घर खरेदी करतो, तेव्हा आपल्याला झोपेत वाईट स्वप्न पडतात. आपण त्यामुळे घाबरून जातो. तुम्ही असा कधी विचार केला आहे का? हे नेमकं कशामुळे होत असेल? यामागे नक्की काय कारण असू शकतं? वास्तुशास्त्रानुसार यामागे तीन प्रमुख कारणं असतात, त्याचबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
झोपण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार सर्वात आधी झोपताना दिशा तपासावी, नेहमी दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय करूनच झोपावं. कधीही दक्षिणेला पाय आणि उत्तरेला डोकं अशा स्थितीमध्ये झोपू नये. यामागे अनेक कारणं आहेत, तुम्हाला यामुळे वाईट स्वप्न देखील पडू शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. सोबतच त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
नकारात्मक ऊर्जा – एखाद्या घरात खूप सारी नकारात्मक ऊर्जा असते, तुम्ही जेव्हा अशा घरात जाता, तेव्हा त्या ऊर्जेचा परिणाम तुमच्यावर होतो. त्यामुळे देखील तुम्हाला अनेकदा वाईट स्वप्न पडू शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.
तुम्ही झोपता त्या बेडीखाली जर अडगळीचं सामान किंवा भंगार वस्तू, खराब झालेल्या इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तरी देखील तुम्हाला या प्रकारची वाईट स्वप्न पडू शतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
