Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प खुश, काहीही न करता 72 तासांत अमेरिकेच्या 3 मोठ्या राजकीय शत्रूंचा गेम ओव्हर

Donald Trump : इराण युद्धाच्या आघाडीवर अजूनही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनासारखं काही घडत नाहीय. पण मागच्या तीन दिवसात ट्रम्प यांना चांगल्या बातम्या मिळाल्या आहेत. 72 तासात अमेरिकेच्या तीन मोठ्या शत्रुंचा राजकीय पटलावरुन खेळ संपला आहे.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प खुश, काहीही न करता 72 तासांत अमेरिकेच्या 3 मोठ्या राजकीय शत्रूंचा गेम ओव्हर
Donald Trump
| Updated on: Jun 24, 2026 | 1:14 PM

मागच्या 72 तासात अमेरिकेच्या तीन मोठ्या शत्रुंचा राजकीय पटलावरुन खेळ संपला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने विशेष काहीही न करता हे घडलं आहे. यात दोन असे शत्रू होते, ज्यांच्याविरोधात येणार्‍या दिवसात कारवाई करणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. ही बातमी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनासाठी मोठा दिलासा आहे. 22 जून ते 24 जून दरम्यान तीन देशांमध्ये राजकीय बदल झाले आहेत. यात ब्रिटन, पेरु आणि कोलंबिया हे देश आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पेरुमध्ये दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या कम्युनिस्टचा पराभव झाला आहे. तिथे कंजरवेटिव केइको फुजीमोरी यांचा विजय झाला आहे. कोलंबियातही पेस्ट्रो यांच्याजागी ट्रम्प समर्थक उमेदवाराला आघाडी मिळाली आहे.

ब्रिटन अमेरिकेचा सहकारी देश आहे. दोन्ही देश नाटोमध्ये सुद्धा आहेत. इराण युद्धाच्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेची साथ दिली नाही. अमेरिकेने ब्रिटनची मदत मिळावी यासाठी अनेकदा विनंती केली. पण स्टार्मर युद्ध काळात तटस्थ राहिले. त्यामुळे अनेकदा ट्रम्प यांनी स्टार्मर यांच्यावर टीका केली. चागोस देण्याच्या स्टार्मर यांच्या निर्णयावरही ट्रम्प नाराज होते. ब्रिटनमध्ये स्टार्मर यांनी राजीनामा दिला आहे. लेबर पक्षातील अंतर्गत वादामुळे स्टार्मर यांना राजीनामा द्यावा लागला. ट्रम्प निश्चितच या निर्णयामुळे खुश आहेत.

सैन्य कारवाईची घोषणा

कोलंबिया दक्षिण अमेरिकेतली एक देश आहे. वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प कोलंबियाच्या गुस्तावो यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचं म्हणाले होते. जानेवारी 2026 मध्ये ट्रम्प यांनी कोलंबिया विरुद्ध सैन्य कारवाईची घोषणा केली. पण गुस्तावो यांनी अमेरिकेशी डील केली. मात्र तरीही ट्रम्प यांना गुस्तावो मान्य नव्हते. कोलंबियातील निवडणुकीत गुस्तावो पिछाडीवर पडले आहेत.

ट्रम्प यांनी घोषणा केलेली

पेरुच्या निवडणुकीत कंजरवेटिव उमेदवाराला विजय मिळाला. ट्रम्प काही दिवसांपूर्वीच कम्युनिस्टांना रोखणार असल्याचं म्हणाले होते. पेरुमध्ये कम्युनिस्ट पुन्हा सत्तेवर आले तर त्यांच्याविरोधात कारवाई करु अशी ट्रम्प यांनी घोषणा केली होती. पेरुच्या जनतेने कम्युनिस्ट नेते सांचेज यांचा पराभव केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us