AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा युद्ध पेटणार? इराणनंतर आता नव्या देशांवर संकट, अमेरिका कोणत्याही क्षणी करणार हल्ला!

US Military Plans : इराणविरुद्धच्या युद्धानंतर आता अमेरिका आणखी तीन देशांविरुद्ध युद्धाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी काळात या देशांवर हल्ले होण्याची शक्यता आहे.

पुन्हा युद्ध पेटणार? इराणनंतर आता नव्या देशांवर संकट, अमेरिका कोणत्याही क्षणी करणार हल्ला!
US May Start Another WarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 15, 2026 | 2:48 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांतता कराराने मिटणार आहे. या युद्धानंतर आता अमेरिका आणखी तीन देशांविरुद्ध युद्धाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. अहवालांनुसार अमेरिक संरक्षण मंत्रालयाने याबाबत प्राथमिक योजना तयार केली आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर आगामी काळात क्यूबा, कोलंबिया आणि पेरू हे देश असल्याचे बोलले जात आहे. कारण हे तिन्ही देश अमेरिकेचे कट्टर विरोधक मानले जातात. विशेषतः क्यूबाबाबत अमेरिका यापूर्वीही अनेकदा कठोर इशारे देत आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत अमेरिकेने सुमारे 400 लहान-मोठ्या युद्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

क्यूबा

इराण युद्धानंतर आता कम्युनिस्ट सरकार असलेला क्यूबा हा देश अमेरिकेच्या रडारवर असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने क्यूबाच्या राष्ट्राध्यक्षांवर बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच क्यूबाच्या आसपास अमेरिकेने मोठ्या प्रमाणात नौदल तैणात केले आहे. 10 जून रोजी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘क्यूबाशी संबंधित कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.’ तसेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी क्यूबाला अयशस्वी राष्ट्र असे म्हटले होते.

कोलंबिया

जानेवारी 2026 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध लष्करी कारवाईची शक्यता वर्तवली होती, मात्र कालांतराने हा मुद्दा शांत झाला, मात्र आता पुन्हा कोलंबियाविरोधात ट्रम्प आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण दक्षिण अमेरिकेतील हा देश अमेरिकेचा विरोधक मानला जातो. कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात अमेरिकेने अनेकदा आक्रमक विधाने केलेली आहेत.

पेरू

एकेकाळी अमेरिका आणि पेरू यांच्यातील संबंध अतिशय चांगले होते. मात्र, पेरूमध्ये वाढत असलेल्या कम्युनिस्ट प्रभावामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पेरूच्या जनतेला थेट इशारा देत म्हटले होते की, ‘येथे कम्युनिस्ट सरकार सत्तेत येऊ नये.’ मात्र या आवाहनानंतरही पेरूमध्ये डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे प्रमुख विरोधक देश

चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे देखील अमेरिकेचे प्रमुख विरोधी देश मानले जातात. याशिवाय व्हेनेझुएला, कोलंबिया, मेक्सिको, पेरू आणि ब्राझील यांच्याशीही अमेरिकेचे संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे या देशांवर अमेरिकेकडून आगामी काळात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी