ज्याची भीती तेच घडलं! डोनाल्ड ट्रम्प यांना दिसतोय युद्धात थेट विजय, आखाती देशांना…

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी केलेल्या विधानानंतर मोठी खळबळ उडाली. थेट इराणमध्येच दोन गट या माध्यमातून बघायला मिळत आहेत. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट विजयाबद्दल मोठे विधान केले.

ज्याची भीती तेच घडलं! डोनाल्ड ट्रम्प यांना दिसतोय युद्धात थेट विजय, आखाती देशांना...
Donald Trump and Masoud Peshmerga
| Updated on: Mar 08, 2026 | 7:28 AM

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज आठवा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 ला इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्याला उत्तर देताना इराणकडून इस्त्रायलवर मोठे हल्ले केले. फक्त हेच नाही तर ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्येही इराणकडून हल्ले करण्यात आले. महत्वाचा समुद्री मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. ज्यामुळे दुबई, साैदी अरेबिया, कतार, कुवेत यासारख्या देशांमध्ये अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. पुढील 10 दिवस पुरेल इतका अन्नसाठा या देशांकडे असून भाज्या आणि फळे कुठेही मिळत नाहीत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल युद्धाचा फटका फक्त याच देशांपुरता मर्यादित राहिला नाही. भारतातही गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून गॅसचा तुटवडा निर्माण झाला. इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इराण युद्ध टोकाला पोहोचले असतानाच आता इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आखाती देशांवरील हल्ल्याबद्दल माफी मागितली. ज्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका इस्रायल आणि मध्य पूर्वेचा विजय म्हणून वर्णन केले. त्यांनी इराणला मध्य पूर्वेचा पराभूत म्हटले. ज्यानंतर आता पुन्हा खळबळ उडाली.

मसूद पेझेश्कियान यांनी म्हटले की, आखाती देशावरील हल्ल्याबाबत मी माफी मागतो. पण त्यांनी इस्त्रायल आणि आमच्या युद्धात पडू नये, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मी माफी मागतो. इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यासोबतच्या युद्धात इराणकडून, दुबई, कतार, कुवेत, इराक, दुबई यासह अन्य आखाती देशांमध्ये हल्ले केले जात आहेत, त्याबद्दल माफी मागण्यात आली.

मसूद पेझेश्कियान यांनी मागितलेल्या माफीनंतर इराणमध्येही मोठा संताप बघायला मिळत आहे. कट्टरपंथी लोक संतप्त झाले आहेत. पेझेश्कियानच्या आश्वासनानंतरही इराणकडून आखाती देशांवर हल्ले सुरूच आहेत. ही माझी म्हणजे युद्धातील आपला विजय असल्याचे थेटपणे अमेरिकेने म्हटले आहे. यामुळे आता इराणमध्ये दोन गट बघायला मिळत आहेत. इराणकडून दुबईच्या विमानतळावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आल्याने विमानसेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे.

 

Follow Us