डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, अमेरिकेच्या कोर्टाचे टॅरिफबद्दल दिला मोठा निर्णय, थेट म्हटले, उद्ध्वस्त..

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. त्यांच्यावर जगभरातून टीका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या टॅरिफच्या निर्णयाला अमेरिकेतूनही विरोध होत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अनेक देश हे एकत्र येताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आपटले तोंडावर, अमेरिकेच्या कोर्टाचे टॅरिफबद्दल दिला मोठा निर्णय, थेट म्हटले, उद्ध्वस्त..
Donald Trump
| Updated on: Aug 30, 2025 | 7:39 AM

डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एक हत्यार म्हणून वापरत आहेत. रशियाकडून तेल खरेदी भारताने बंद करावी, यासाठी त्यांनी थेट 50 टक्के टॅरिफ लावले. शिवाय अमेरिकेकडूनही सांगण्यात आले की, जर रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले तर तुमच्यावरील 25 टक्के टॅरिफ हा काढला जाईल. जगातील अनेक देश हे अमेरिकेच्या हुकूमशाहला वैतागले आहेत. हेच नाही तर काही देश हे अमेरिकेच्या विरोधात मैदानात येताना देखील दिसत आहेत. आता नुकताच कोर्टाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका देण्यात आला.

अमेरिकेच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेमध्ये मोठी खळबळ उडालीये. शुक्रवारी अमेरिकेच्या कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला थेट बेकायदेशीर म्हटले. यूएस कोर्ट ऑफ अपिल्स द फेडरल सर्किट यांचे म्हणणे आहे की, राष्ट्राध्यक्षाला काही आणीबाणीचे अधिकार असले तरीही त्यात जकात किंवा टॅरिफ लादण्याच्या अधिकाराचा समावेश नाहीये. हा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे.

रिपोर्टनुसार, कोर्टाने टॅरिफ 14 ऑक्टोबरपर्यंत ठेवण्याची अनुमती दिली आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प सरकार या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात धाव देखील घेऊन शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या आदेशाला न मानता टॅरिफ हा पुढेही चालू ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या या निर्णयाला चुकीचे आणि पक्षपाती म्हटले असून हा निर्णय अमेरिकेची वाट लावेल असे त्यांनी म्हटले.

आम्ही सुप्रीम कोर्टाच्या मदतीने टॅरिफचा वापर देशाच्या हितासाठी करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व टॅरिफ लागू आहेत, आज एक अत्यंत पक्षपाती अर्जावर कोर्टाने चुकीच्या पद्धतीने आमच्या टॅरिफला हद्दपार केले पाहिजे म्हटले. पण मला माहिती आहे की, शेवटी विजय हा अमेरिकेचाच होणार आहे, जर टॅरिफ काढले तर तो देशासाठी अत्यंत चुकीचा निर्णय असेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प अनेक देशांना टॅरिफची धमकी देऊन काही अटी मान्य करून घेताना सध्या दिसत आहेत.