AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटात दुखत असेल तर या 4 चाचण्या फायद्याच्या, झटपट होते निदान, पाहा कोणत्या ?

जर तुम्हाला पोटदुखीचा किंवा अपचनाचा कोणाताही आजार वारंवार होत असेल तर या चार चाचण्या करणे गरजेचे असते. कोणत्या या चार याची माहिती घेऊयात..

पोटात दुखत असेल तर या 4 चाचण्या फायद्याच्या, झटपट होते निदान, पाहा कोणत्या ?
abdominal pain
| Updated on: Mar 17, 2026 | 10:17 PM
Share

अनेक आजार हे पोटाशी संबंधित असतात. त्यामुळे पोटाच्या आरोग्याला महत्व खूप असते. भारतात आहाराची शैली आणि जीवन शैलीत बदल झाल्याने अनेक जणांना पोट आणि पचनाशी संबंधित आजाराने ग्रासलेले आहे. अनेकदा पोटदुखी आणि गॅसला किरकोळ समस्या समजून लोक दुर्लक्ष करत असतात. परंतू हे आजार कोणत्याही गंभीर समस्येची सुरुवात असू शकतात.अलिकडेच एका गॅस्ट्रो एक्सपर्टने ४ अशा आवश्यक टेस्ट सांगितल्या आहेत. ज्या सर्वांनी करायला हव्यात. जर या टेस्टचे रिपोर्ट सामान्य आले तर चिंता करण्याची काही गरज नाही. चला या टेस्ट कोणत्या ते पाहूयात….

वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोटाच्या आरोग्याचा संबंध संपूर्ण शरीराशी असतो. अनेक लोकांना आयबीएस (IBS ) सारख्या समस्याचा सामना करावा लागतो.परंतू त्यांना याचे अचून निदान कसे होते याची माहिती नसते. भारतीय लोकांनी या चार टेस्ट करणे महत्वाचे असते. यास तुम्ही ‘4C’ फॉर्म्युला म्हणू शकता. यात सीबीसी (CBC), सीआरपी (CRP), कॅलप्रोटेक्टिन (Calprotectin )आणि सीलिएक सेरोलॉजी (Celiac Serology ) यांचा समावेश आहे.

CBC आणि CRP

सर्वात पहिली टेस्ट आहे सीबीसी म्हणजे कंप्लिट ब्लड काऊंड. ही टेस्ट शरीरात हीमोग्लोबिन, इन्फेक्शन आणि अन्य महत्वपूर्ण घटकांची माहिती देते. तेच CRP ( सी-रिएक्टिव्ह प्रोटीन ) टेस्ट सांगते की शरीरात कुठे सूज तर नाही. जर सीआरपीची पातळी वाढली तर हा इशारा असतो की शरीराच्या अंतर्गत भागात, विशेष करुन आतड्यात काही प्रॉब्लेम असू शकतात.

कॅलप्रोटेक्टिन आणि सीलिएक सेरोलॉजी –

तिसरी टेस्ट आहे कॅलप्रोटेक्टिन. ही शरीरातील मैल्याची चाचणी असते.या चाचणी आतड्यांना सूज आली आहे का ? ते कळते. जर वारंवार जुलाब आणि पोटातील वेदनेची तक्रार आहे तर ही टेस्ट खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चौथी चाचणी सीलिएक डिसिज सेरोलॉजी. भारतात गव्हापासून एलर्जीचे (Gluten Allergy)प्रकार वाढत आहेत. या चाचणीमुळे कळते की तुमचे शरीर ग्लुटेन पचवत आहे की नाही.

IBS आहे हे केव्हा कळते ?

तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या रुग्णाचे वरील चारही चाचण्या नॉर्मल असतील तरीही त्याला पोटात त्रास होत असेल तर त्याला आयबीएस (Irritable Bowel Syndrome) सिंड्रोम म्हटले जाते. आयबीएस हा कोणताही घातक आजार नाही. तो एक फंक्शनल डिसऑर्डर आहे. ज्यास योग्य आहार आणि तणावमुक्त जीवन जगून दूर करता येते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...