AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे धक्कादायक कारण पुढे, हैराण करणारा अहवाल….

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. हेच नाही तर भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आहे. भारताने हा टॅरिफ टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केली. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दादागिरीवर आणि धमक्यांवर कायम राहिले.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे धक्कादायक कारण पुढे, हैराण करणारा अहवाल....
Donald Trump
| Updated on: Aug 29, 2025 | 8:04 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आणि त्या अधिसूचनेवर सह्या देखील केल्या. जगभर भारत अमेरिका मित्र असल्याचे सांगणारे डोनाल्ड ट्रम्प हे भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे. भारत रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणात खरेदी करतो आणि त्याबदल्यात रशियाला पैसा देतो, रशिया याच पैशातून युक्रेनच्या विरोधात लढण्यासाठी आणि लोकांचे जीव घेण्यासाठी मशिने खरेदी करत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे, याकरिता भारतावर दबाव टाकला जात आहे.

आता नुकताच धक्कादायक अशी माहिती पुढे येताना दिसत आहे. भारतावर टॅरिफ लावण्याचे खरे कारण हे रशियाचे तेल खरेदी करणे नसलयाचे पुढे आलंय. अमेरिकन ब्रोकरेज फर्म जेफरीजने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यानंतर जगात खळबळ उडालीये. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, पाकिस्तान आणि भारतात चार दिवस संघर्ष सुरू होता. या युद्धात आपण मध्यस्थी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला. मात्र, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षा होती की, भारत त्यांचा दावा खोटा आहे, असे अजिबात म्हणणार आहे. पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या संघर्षात भारताने कधीही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप स्वीकारलेला नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून परत परत दावा केला जातो की, मी हस्तक्षेप केल्यानेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले होते. हे युद्ध परमाणू हल्ल्यांपर्यंत पोहोचले होते. मी जगातील सर्वात मोठे होणारे युद्ध थांबवले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाबाबत केलेला दावा खोटा असल्याचे अनेकदा भारताकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याची संधी निघून गेली. अमेरिकन फर्मच्या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, भारत आणि अमेरिकेत शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही समस्या नाही. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढल्यानेच भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात राग आहे आणि त्यामुळेच त्यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा