नाही तर आम्ही विकून टाकू… डोनाल्ड ट्रम्प यांची थेट या देशाला धमकी, रशिया आणि चीन मैदानात

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जगाला एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट एका देशाला मोठी धमकी दिली आहे. तिथल्या अध्यक्षाला थेट पद सोडण्यास सांगितले आहे. नाही तर जप्तीचा इशारा दिला.

नाही तर आम्ही विकून टाकू... डोनाल्ड ट्रम्प यांची थेट या देशाला धमकी, रशिया आणि चीन मैदानात
Donald Trump's threat
| Updated on: Dec 23, 2025 | 2:08 PM

सध्याच्या घडीला अमेरिका जे काही निर्णय घेत आहे, त्यामुळे जगात खळबळ उडताना दिसत आहे. अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात व्हेनेझुएलाविरुद्ध लष्करी नाकेबंदी लादली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलाला थेट टार्गेट केले असून त्यामुळे त्याच्या तेल व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. अमेरिका ज्याप्रकारे व्हेनेझुएलाविरोधात कारवाई करत आहे ते अन्याय असल्याचे म्हणत रशिया आणि चीन व्हेनेझुएला मदत करण्यासाठी पुढे आलेत. युक्रेनला मदत करत असल्याने रशिया आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. हेच नाही तर अनेक देशांवर रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी मोठा दबाव अमेरिकेचा आहे. अमेरिकेने भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत असल्याचे स्पष्ट केले. भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला.

यापूर्वीच चीनने म्हटले की, व्हेनेझुएलाविरुद्ध अमेरिकेच्या मनमानी कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहेत. आता रशिया देखील व्हेनेझुएलाच्या समर्थनासाठी मैदानात उतरला आहे. रशिया आणि चीनकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएला सरकारला टार्गेट केले. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएला धकावताना दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना थेट धमकी देत म्हटले की, जर त्यांनी सत्ता सोडली नाही, तर ते जप्त केलेले सर्व व्हेनेझुएलाचे तेल विकून टाकतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीमुळे जगात मोठी खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प याची यांच्या या मुजोरीविरोधात चीन आणि रशिया एकत्र आले असून त्यांनी थेट व्हेनेझुएलाची बाजू घेतली.

डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, निकोलस मादुरो यांनी त्यांचे पद सोडले तरच त्यांचा फायदा आहे नाही तर आम्ही पूर्ण तेल विकून टाकणार आहोत. रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ही घोषणा केली असून, रशिया व्हेनेझुएलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे म्हटले आहे. रशियाने व्हेनेझुएला साथ दिल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला. सप्टेंबरपासून अमेरिकेने या प्रदेशात अनेक नौदल जहाजे तैनात केली आहेत.