तर मग आम्ही त्यांना प्रचंड यातना देऊ… डोनाल्ड ट्रम्प यांची थेट या मुस्लिम राष्ट्राला धमकी, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका रात्रीत वेनेजुएलावर हल्ले करून तेथील नियंत्रण कशापद्धतीने मिळवले हे जगाने बघितले. वेनेजुएलाचे अध्यक्ष अमेरिकेच्या ताब्यात आहेत. आता त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून एका देशाला मोठी धमकी दिली.

तर मग आम्ही त्यांना प्रचंड यातना देऊ... डोनाल्ड ट्रम्प यांची थेट या मुस्लिम राष्ट्राला धमकी, जगात खळबळ
Donald Trump threat
| Updated on: Jan 10, 2026 | 8:45 AM

इराणमध्ये लोक सध्या रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. वाढत्या महागाईला कंटाळून लोक रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. यादरम्यान इराण सरकारने हे आंदोलन रोखण्यासाठी थेट आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारानंतर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सरकारला मोठा इशारा दिला. इराणने स्पष्ट केले की, आमच्या सुरक्षेच्या आत येऊन कोणी ढवळाढवळ करत असेल आणि देश संकटात येईल तर त्याचे हात कापले जातील. इराणने अमेरिकेला थेट उत्तर देत त्यांचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामध्येच इराणमधील आंदोलन हे अधिक चिघळताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू असून परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनीही या वादात पुन्हा उडी घेत मोठे विधान केले.

आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी देत म्हटले की, आमचे इराणच्या परिस्थितीवर बारीक लक्ष असून जर सरकारने गोळ्या झाडल्या तर मग आम्ही गोळीबार करू. इराणने आंदोलकांना दिलेल्या त्रासापेक्षा कितीतरी जास्त त्रास त्यांना सहन करावा लागेल. इराणमध्ये ज्याप्रकारे डोनाल्ड ट्रम्प हस्तक्षेप करत आहेत, त्यानंतर इराण सरकारने मोठा निर्णय घेत थेट इंटरनेट काही भागात बंद केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराण सध्या मोठ्या संकटात आहे. लोक अशा काही शहरांवर नियंत्रण मिळवत आहेत, ज्याचा आम्ही कधी साधा विचारही केली नव्हता. आमची तेथील परिस्थितीवर बारीक नजर आहे. इराण सरकारने लोकांना मारण्यास सुरूवात केली तर आम्ही थेट हस्तक्षेप करणार आहोत. आम्ही त्यांना प्रचंड त्रास देऊ.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनावरून मोठा इशारा दिला. हेच नाही तर त्यांनी सांगितले की, इस्लामी देश कोणाच्याही दबावापुढे अजिबातच झुकणार नाही. हेच नाही तर त्यांनी आरोप केला की, आंदोलकांना मुद्द्याम पाठिंबा दिला जात आहे आणि इस्लामी शासन अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय.