
टॅरिफच्या मुद्द्यात भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात असल्याचे बघायला मिळाले. मुळात म्हणजे भारत आणि अमेरिकेची अनेक वर्षांची मैत्री आहे. मात्र, टॅरिफच्या मुद्द्यात कुठेतरी संबंध ताणले गेले. आता अमेरिकेने 25 टक्के टॅरिफ 18 टक्क्यांवर आणला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ अशा असून 50 टक्के टॅरिफ लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील परस्पर टॅरिफ 18 पर्यंत कमी करण्याची घोषणा केली. त्यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबतही मोठा केला. भारतावर मोठा टॅरिफ लावण्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगताना दिसले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप जास्त चांगले मित्र आहेत. आता त्यांनी भारतावरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी केला. भारतावरील टॅरिफ कमी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इंडिया गेटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटची भारताचे भव्य विजयी कमान म्हणून वर्णन केले. ट्रुथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटचा फोटो शेअर करत लिहिले की, भारताचा इंडिया गेट हा एक भव्य ऐतिहासिक वारसा आहे… पण आमचा ट्रायम्फल आर्च मोठा आणि महान असेल.. ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये इंडिया गेटसारखी रचना बांधण्याची त्यांची इच्छा असल्याचे संकेत आहेत.
अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वॉशिंग्टन डीसीमध्ये एक भव्य ट्रायम्फल आर्च बांधण्याची योजना ट्रम्प विचारात घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंडिया गेटचा भव्य असा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. मागील काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारत दाैऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारतातील महत्वाच्या वास्तूंना भेट दिली.
भारतातील इंडिया गेट डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच आवडल्याचे बघायला मिळत आहे. भारतावर विरोधात सतत भूमिका घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची आता भूमिका मवाळ झाली आहे. त्यांनी जाहीर केले की, आम्ही भारतावरील टॅरिफ कमी करत आहोत. भारतासोबतची मैत्री कायम ठेवण्यासाठी अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याचे बोलले जात आहे.