डोनाल्ड ट्रम्प बरळले, भारत-पाक युद्धाबाबत तो धक्कादायक दावा, म्हणाले, दोन्ही देश..

डोनाल्ड ट्रम्प भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठा दावा करताना दिसतात. आता त्यांनी पुन्हा एकदा दावा करत दोन्ही देशांसोबत त्यादरम्यान नेमके काय संभाषण झाले हे सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प बरळले, भारत-पाक युद्धाबाबत तो धक्कादायक दावा, म्हणाले, दोन्ही देश..
Donald Trump India Pakistan war
| Updated on: Oct 20, 2025 | 12:41 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प धक्कादायक निर्णय घेत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेत गेले होते आणि मोठी सभा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ घेतली. आता तेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावून भारताला धमकावण्याचे काम करत आहेत. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला बोलताना म्हटले की, सात विमान पाडली गेली होती. हे खरोखरच जास्त होते. त्यांच्यामध्ये परमाणू युद्ध होणार होते.

मी भारत आणि पाकिस्तानला जवळपास एकसारखेच बोललो. मी त्यांना स्पष्ट म्हणालो की, हे बघा तुम्ही जर एकमेकांविरोधात युद्ध केले तर मी तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यापार करणार नाही आणि तुमच्यावर 200 टक्के टॅरिफ लावेल. यामुळे तुम्हाला आमच्यासोबत व्यापार करणे शक्यच होणार नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, रशियाकडून तेल घेणे ते बंद करणार आहेत.

पण जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना खूप जास्त मोठी किंमत मोजावी लागेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, नरेंद्र मोदी यांनी मला आश्वासन दिले की, ते रशियाकडून तेल खरेदी बंद करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम पडला. जवळापास भारतातून अमेरिकेत होणारी निर्यात बंद झालीये. याचा परिणाम काही क्षेत्रांमध्ये सर्वाधिक बसलाय.

भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भारत दाद देत नसल्याने त्यांचा अधिकच जळफळाट उठल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून कायम राहतील म्हणताना दिसतात. मात्र, दुसरीकडे तेल खरेदी न करण्यासाठी धमक्या आणि टॅरिफ लावत आहेत.