डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यातून 100 टक्के मुंग्या निघणार, या देशाच्या राष्ट्रपतींचं भारतासोबतच्या व्यापारावर मोठे विधान, भारतीय लोक…
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अनेक देश हे भारताच्या जवळ येताना दिसले. भारतासाठी त्यांनी त्यांची बाजारपेठ खुली केली. हेच नाही तर याकाळात भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार देखील केले.

अमेरिकेने भारतासह ब्राझीलवर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर ब्राझीलने सर्व संबंध अमेरिकेसोबत तोडले. हेच नाही तर अगोदर टॅरिफ काढा मग पुढचे बघू ही भूमिका ब्राझीलने घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एकीकडे मित्र देश असल्याचे सांगतात आणि दुसरीकडे मोठा टॅरिफ लावतात म्हणून ब्राझील त्यांच्यावर चिडला आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी नुकताच आता भारताबद्दल मोठे विधान केले असून पुढील काळात आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी भारतासोबत एक धोरणात्मक युती करण्यास उत्सुक आहे, असे म्हटले. ब्राझील आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिली आहेत.
विशेष म्हणजे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट उपराष्ट्रपती गेराल्डो अल्कमिन यांच्या भारत भेटीनंतर शेअर केली. लुला यांनी भविष्यात भारत आणि ब्राझीलमध्ये मोठी आणि महत्वाची व्यापार साझेदारी होईल, असे स्पष्ट म्हटले. आपण भारतासोबत राजकीय, अवकाश, उद्योजकीय आणि आर्थिक क्षेत्रात एक उत्तम युती निर्माण करू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
अमेरिकेने लावल्या टॅरिफनंतर ब्राझील देखील होणारे नुकसान भरून काढण्यासाठी पर्याय शोधत आहेत. भारतावर अमेरिकेने लावलेला 50 टक्के टॅरिफनंतर भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करण्याचा निर्णय घेतला. अनेक देशांसोबत तसा करार देखील करण्यात आला. आता ब्राझीलसोबतही भारत काही महत्वाचे करार करणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांना फायदा होईल.
वाढत्या जागतिक व्यापार तणावादरम्यान भारत आणि ब्राझीलचे संबंध मजबूत होत आहेत. लूला म्हणाले की, भारत आणि ब्राझीलमध्ये परस्पर आदर आणि मैत्रीपूर्ण संबंध नक्कीच आहेत आणि तेच संबंध पुढे देखील न्यायचे आहेत. ब्राझीलच्या लोकांना भारतीय लोक आवडतात आणि भारतीय लोकांना देखील ब्राझीलचे लोक आवडतात. भारतासोबत एक मजबूत धोरणात्मक भागीदारी निर्माण करू, ज्याचा फायदा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला होईल. भारत आणि ब्राझील ज्याप्रकारे जवळ आला, ते पाहून नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यातून मुंगा उठणार हे स्पष्ट आहे.
