AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..

इराण आणि अमेरिका युद्ध धक्कादायक स्थितीत पोहोचले आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होण्याऐवजी आता वाढताना दिसत आहे. ज्याची भीती आहे तेच घडताना दिसतंय.

शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुन्हा इराण उद्ध्वस्त होणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितली तारीख, हाहाकार..
Donald Trump
| Updated on: May 20, 2026 | 8:27 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धातील तणाव कमी व्हावा, ही जगाची इच्छा असताना तणाव अधिक वाढत आहे. त्यामध्येच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी युद्ध लवकरच संपणार असल्याचे बोलताना दिसतात तर थेट हल्ला करण्याबाबतही बोलत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणवर मोठा हल्ला कधी होणार यावर भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणवरील नवीन हल्ल्याची तारीख जाहीर केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या बोलण्याने मोठा हाहाकार उडाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, ते पुन्हा इराणवर हल्ला करू शकतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, पत्रकारांसोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझी इच्छा आहे की, आम्हाला युद्ध करण्याची वेळ येऊ नये. मात्र, आम्हाला पुन्हा एकदा इराणला मोठा झटका देण्याची वेळ येऊ शकते. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले की, इराणवर कधी हल्ला होणार?

यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला वाटते की, दोन ते तीन दिवसात करू. कदाचित शुक्रवार, शनिवार किंवा रविवार.. पुढच्या आठवड्याच्या सुरूवातीला काहीतरी होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाने इराणवर हल्ला होण्याची शक्यता वाढली आहे. मंगळवारीच अमेरिका इराणवर हल्ला करणार होती. मात्र, तीन आखाती देशांनी महत्वपूर्ण चर्चा इराणसोबत सुरू असल्याने हल्ला करू नये, अशी विनंती केली.

त्यामुळे अमेरिकेने हल्ला केला नाही. अमेरिकेकडून मंगळवारच्या इराणच्या हल्ल्याची पूर्ण तयारीही करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सतत हल्ल्याची धमकी मिळत असताना इराणने स्पष्ट केले की, आम्ही प्रत्येक हल्ल्याकरिता तयार आहोत. अमेरिका इराणच्या भूमीत आपले लष्कर उतरवण्याच्या तयारीत आहे. जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला तर मोठी भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते.

युद्ध थांबण्यापेक्षा अधिक घातक होईल. हेच नाही तर यादरम्यान अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी युरोपिय देशांना इराणविरोधात या युद्धात अमेरिकेची साथ देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन चीनच्या दाैऱ्यावर जात आहेत. यावेळी ते चीनचे अध्यक्ष शी जिनिपिंग यांच्यासोबत इराणच्या युद्धाबाबत चर्चा करू शकतात. अमेरिकेने होर्मुज खाडीत अनेक देशांची मदत मागितली. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीला पुढे आला नाही.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ