AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले, लवकरच..

इराण आणि अमेरिका युद्धाची झळ भारतासह अन्य देशांना बसत आहे. ऊर्जेचे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले. पहिल्यांदाच थेटपणे डोनाल्ड ट्रम्प यावर बोलताना दिसले.

जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्ध थांबणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट म्हटले, लवकरच..
Donald Trump
| Updated on: May 20, 2026 | 7:39 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला 12 आठवड्यांपेक्षाही जास्त काळ झाला. अमेरिकेने इराणवर हल्ला केला होता, त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराण अमेरिका युद्ध फार तर फार चार आठवडे सुरू राहिल. तिथेच त्यांचा अंदाज चुकला. सर्वाेच्च नेत्याला ठार केल्यानंतर इराण शरण जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले होते. मात्र, सर्वाेच्च नेत्याच्या निधनानंतर इराण अधिक घातक बनला. इराणवर इतक मोठे हल्ले झाले, पण इराण कुठेच हार मानताना दिसला नाही. उलट थेट ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणीही हल्ले केले. होर्मुज खाडी बंद करण्याचा इराणने निर्णय घेतला. होर्मुज खाडी बंद असल्याने तेलाचे मोठे संकट उभे आहे. कच्च्या तेलाची वाहतूक बंद असल्याने जागतिक बाजारापेठेत तेलाच्या कितमी गगणाला पोहोचल्या आहेत. अनेक देशांनी याकरिता अमेरिकेला दोषी ठरवले. इस्त्रायलच्या भडकाव्यात येऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी हा हल्ला करून चूक केल्याचे बोलले जात आहे.

इराण अमेरिकेने दिलेला युद्धविरामचा प्रस्ताव मान्य करत नाही. होर्मुज खाडीही सुरू करत नाही. इराणकडून कोणताही पर्याय उरला नसून मोठा हल्ला केला जाईल, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली. मंगळवारी मोठा हल्ला इराणवर होणार होता. मात्र, आखाती देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती करत आम्ही इराणसोबत चर्चा करत आहोत, चर्चा महत्वपूर्ण ठप्प्यात आहेत, त्यामुळे हल्ला नको अशी विनंती केली.

मंगळवारच्या हल्ल्याची सर्व तयारी अमेरिकेकडून करण्यात आली होती. मात्र, साैदी अरेबिया, कतार आणि युएईच्या विनंतीनंतर अमेरिकेने हल्ला केला नाही. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबतचे युद्ध लवकरच संपेल. पहिल्यांदाच स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतचे युद्ध लवकरच संपेल, यावर बोलताना दिसले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, युद्ध लवकरच संपेल. युद्ध संपल्यानंतर जागतिक बाजार तेलाच्या किमती कमी होतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, युद्धविराम चर्चा अंतिम टप्प्यात आहे. इराण आणि अमेरिका युद्ध लवकर थांबवावे, ही संपूर्ण जगाची इच्छा आहे. त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीबाबत थेट भाष्य करण्यात आले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ