जगाला ज्याची प्रतिक्षा त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, थेट म्हटले युद्ध संपणार..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले आहे. सर्वच देशांवर या युद्धाचा गंभीर परिणाम होत आहे. ऊर्जेचे संकट आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत अत्यंत मोठे विधान केले. युद्ध लवकरच थांबण्याबाबत त्यांनी थेट भाष्य केले.

जगाला ज्याची प्रतिक्षा त्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, थेट म्हटले युद्ध संपणार..
Donald Trump
| Updated on: May 13, 2026 | 9:29 AM

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प चीन दाैऱ्यावर आहेत. त्यांचा हा पूर्वनियोजित दाैरा आहे. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात होते. चीन दाैऱ्यावर जाण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, युद्ध लवकरच संपेल. मात्र, यावेळी त्यांनी थेट इराणला मोठा इशारा दिला. इराणकडे योग्य रस्त्यावर चालण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक उरला नसल्याचे त्यांनी म्हटले. इराणसोबतचे युद्ध थांबण्याकरिता चीनची मदत घेणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, तणाव अधिक वाढताना दिसतोय. ट्रम्प यांनी चीन दाैऱ्यापूर्वी म्हटले की, त्यांच्या दौऱ्याचा मुख्य भर व्यापारावर असेल.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, इराणविरुद्धच्या युद्धावर अमेरिकेला आतापर्यंत अंदाजे 29 अब्ज डॉलर्सचा खर्च आला आहे. हा आकडा दोन आठवड्यांपूर्वी पेंटागॉनने काँग्रेससमोर सादर केलेल्या 25 अब्ज डॉलर्सच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. वाढता खर्च आणि सततच्या तणावामुळे अमेरिकेत चिंता वाढली आहे. याबाबत अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य देखील केले.

युद्धाचा परिणाम अमेरिकेतील सामान्य लोकांवरही जाणवू लागला आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांचा विचार केला असता महागाई प्रचंड वाढली आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने पेट्रोलच्या किमतींचा एक नवीन अंदाज जाहीर केला. गॅसच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली. यादरम्यानच अमेरिकेतील वाढती महागाई यावर प्रश्न विचारला असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट मला अमेरिकेतील वाढती महागाईची पर्वा नसल्याचे म्हटले होते.

ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली. जगाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इराण आणि अमेरिका युद्ध नको आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवले पाहिजे, याकरिता जग आग्रही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकरच संपणार असल्याचे म्हटले खरे पण त्यांनी युक्रेन रशिया युद्ध लवकरच संपेल असे म्हटले. इराण आणि अमेरिका युद्धाची झळ जगाला बसत आहे.

Follow Us