जगाला ज्याची भीती तीच धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, इराणच्या..

इराण आणि अमेरिका यांच्यात मागील काही महिन्यात तणाव प्रचंड वाढला होता. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणवर पुढे कसा हल्ला केला जाईल.

जगाला ज्याची भीती तीच धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, इराणच्या..
Donald Trump
| Updated on: Oct 17, 2026 | 2:54 PM

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्ध पुकारले. इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होते. त्यानंतर अमेरिकेने या युद्धात उडी मारली. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचे मोठे नुकसान झाले. मात्र, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला की, अमेरिका आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कोणत्याही प्रकारच्या युद्धात सहभागी होणार नाही. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अमेरिकेने अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. होर्मुज खाडीवर अमेरिकेचा दावा असल्याचे मोठे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. CNN च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे सैन्य इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर आणि परमाणू केंद्रांवर हल्ला करण्याचा नवीन पर्याय शोधत आहे. न्यूजमॅक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मदर ऑफर ऑल बॉम्ब परमाणू बॉम्ब होत नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, नाही मी परमाणू शस्त्रांचा वापर करणार नाही. आम्हाला त्याची गरज नाही. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, ते इराणमध्ये अमेरिकेचे सैनिक उतरवणार का? यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला असे वाटत नाही. आम्ही इराणवर हल्ला करण्यासाठी सध्या पर्याय शोधत आहोत.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही इराणला परमाणू शस्त्र मिळू देणार नाहीत. इराणची परमाणू सुविधा या डोंगरांच्या खाली आहेत. आता अमेरिका त्याच डोंगराला टार्गेट बनवण्याचा विचार करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 मध्ये अफगाणिस्तानच्या इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर MOAB टाकण्यासाठी मंजूरी दिली होती.

यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचे टेन्शन वाढवत म्हटले की, अमेरिकेजवळ सर्वात मोठे परमाणू शस्त्र आहेत.  रशिया दुसऱ्या स्थानावर आहे. चीन हा तिसऱ्या स्थानावर आहे. पाच वर्षात अमेरिका पहिल्या क्रमांकावर पोहोचली. परमाणू शस्त्रांची संख्या कमी करण्यासाठी अमेरिका चीन आणि रशियासोबत चर्चा करत आहे. पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर परमाणू हल्ला करणार नसल्याचे स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us