AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प करणार ‘या’ देशाचे तुकडे, जोरदार धक्का, कुटनीती सुरूच..

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा डाव टाकला आहे. सध्या घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे बघायला मिळतंय. आज अमेरिकेत महत्वाची मिटिंग पार पडणार असून याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. टॅरिफचा वाद सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प अजून एक जगाला धक्का देणारी गोष्ट करत आहेत.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प करणार 'या' देशाचे तुकडे, जोरदार धक्का, कुटनीती सुरूच..
| Updated on: Aug 18, 2025 | 1:53 PM
Share

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतच्या भेटीनंतर आज डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांची भेट घेणार आहे. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत ही भेट आहे. रशियासोबत लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनची मदत केली हे जगजाहीर आहे. मात्र, यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आणि त्याचा वाईट परिणाम हा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. युक्रेन आणि रशियामध्ये मध्यस्थी करत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगितले जातंय. मात्र, हे युद्ध थांबवण्याच्या बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युक्रेनचे तुकडे केले जाणार आहेत. काही अट वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यापुढे ठेवल्या जातील आणि त्यानंतरच हे युद्ध संपेल.

जर हे युद्ध युक्रेनला संपवायचे असेल तर त्यांना क्रिमियासह दोन मोठी शहरे रशियाला देण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. फक्त हेच नाही तर नाटोमध्ये सहभागी देखील त्यांना होता येणार नाही. जर युक्रेनने डोनाल्ड ट्रम्प यांची अट मान्य केली तर त्यांच्या देशाचा मोठा भाग हा रशियाकडे जाईल. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी वोलोदिमीर जेलेंस्की हे मान्य करतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. कारण मागच्यावेळी वोलोदिमीर जेलेंस्की यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चांगलीच वादावादी झाली होती.

फक्त वादावादीच नाही तर वोलोदिमीर जेलेंस्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतची मिटिंग अर्धवट सोडून आपल्या देशाकडे निघून गेले होते. आता परत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे निमंत्रण स्वीकारले आहे आणि ते भेट घेणार आहेत. मात्र, इतक्या वर्षांच्या युद्धानंतर युक्रेनच्या हाती काय पडले हा प्रश्न उपस्थित होता? कारण एक मोठा भाग त्यांच्या हातून जात आहे शिवाय दोन मोठी शहरे आणि नाटोचे सदस्य देखील त्यांना होता येणार नाहीये आणि यादरम्यान त्यांच्या देशाचे मोठे नुकसान झाले.

युद्धाच्या दरम्यान अमेरिकेने मोठी मदत युक्रेनला केली. मात्र, आता तिच अमेरिका युक्रेन आणि रशियातील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. वोलोदिमीर जेलेंस्की हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटी मान्य करतात का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, आजच्या या बैठकीकडे जगाच्या नजरा लागल्या असल्याचे बघायला मिळत आहे. सध्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आल्याचेही बघायला मिळत आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक