स्वार्थी डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर, सहा महिन्यांत… भारतावर टॅरिफ लावताच धक्कादायक आकडे समोर!

भारतासह त्यांनी अन्य काही देशांवरही ट्रम्प यांनी टॅरिफ लावलेला आहे. हा टॅरिफ लावून मी एका प्रकारे अमेरिकेचं हीत साधलेलं आहे, असा दावा त्यांच्याकडून नेमही केला जातो. अमेरिका फर्स्टचा ते नेहमी पुरस्कार करत असतात. दरम्यान, आता मी हे सगळं अमेरिकेच्या हितासाठी करत आहे, असं सांगत असलेल्या ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यात करोडो रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले आहेत.

स्वार्थी डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर, सहा महिन्यांत... भारतावर टॅरिफ लावताच धक्कादायक आकडे समोर!
donald trump
| Updated on: Aug 23, 2025 | 3:46 PM

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावून फक्त भारतच नव्हे तर रशिया आणि इतर देशांनाही चकित केलं आहे. ट्रम्प हे रोजच नवनवे नियम घेऊन येतात. भारतासह त्यांनी अन्य काही देशांवरही टॅरिफ लावलेला आहे. हा टॅरिफ लावून मी एका प्रकारे अमेरिकेचं हीत साधलेलं आहे, असा दावा त्यांच्याकडून नेमही केला जातो. अमेरिका फर्स्टचा ते नेहमी पुरस्कार करत असतात. दरम्यान, आता मी हे सगळं अमेरिकेच्या हितासाठी करत आहे, असं सांगत असलेल्या ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यात करोडो रुपये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले आहेत.

कोणती नवी माहिती समोर आली?

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत केलेल्या गुंतवणुकीचे आकडे पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ट्रम्प हे स्वत: उद्योजक आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झालेला आहे. अमेरिकेती माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी गेल्या सहा महिन्यात एकूण 860 कोटी रुपये वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवले आहेत. त्यांच्या याच गुंतवणुकीवर आता अमेरिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली कोट्यवधींची गुंतवणूक

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या रिपोर्ट्स नुसार डोनाल्ड ट्रम्प 21 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पुढच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत तब्बल 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 860 कोटी रुपयांची गुंतवणूक वेगवेगळ्या कंपन्यांत केली आहे. ही गुंतवणूक बाँण्डच्या माध्यमातून असून तेथील वेगवेगळ्या राज्यांत, माहपालिकांशी संबंधित आहे. या काळात ट्रम्प यांनी 600 पेक्षा जास्त ट्रान्झेशन्स केले आहेत.

व्हाईट हाऊसने काय खुलासा केला?

अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या सहा महिन्यांत सिटीग्रुप, मॉर्गन स्‍टेनली, वेल्‍स फार्गो, मेटा, क्‍वालकॉ तसेच अन्य कंपन्यांत गुंतवणूक केलेली आहे. यासह त्यांनी तेथील राज्य, काऊंटीज, जिल्ह्यांनी जारी केलेल्या बॉण्ड्समध्येही भरपूर पैसे गुंतवले आहेत. दरम्यान त्यांनी केलेली ही गुंतवणक समोर आल्यानंतर अमेरिकेतील व्हाईट हाऊसने खुलासा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे वेळोवेळी त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा खुलासा करत असतात. सध्या समोर आलेल्या गुंतवणुकीत डोनाल्ड ट्रम्प तसेच त्यांच्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही, असे व्हाईट हाऊसने सांगितले आहे. ही गुंतवणूक थर्ड पार्टीकडून करण्यात आलेली आहे, असेही व्हाईट हाऊसने सांगितले आहे.