डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा, जगातील अनेक देशांना हादरा, मोठी खळबळ
टॅरिफचा वाद टोकाला गेलेला असताना डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक धक्के जगाला देताना दिसत आहेत. टॅरिफवरून गोंधळ सुरू असतानाच त्यांनी अजून एक धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या टॅरिफच्या निर्णयानंतर जगात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे कशावर आणि कोणत्या देशावर टॅरिफ लावतील याचा नेमच राहिला नाहीये. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय हा त्यांच्याकडून घेण्यात आला आहे. हेच नाही तर टॅरिफच्या अटी मान्य करण्यासाठी त्यांच्याकडून दबाव टाकला जात असतानाच भारतावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका देखील केली जात आहे. आता टॅरिफवरून तणाव असतानाच त्यांनी टॅरिफबद्दल अजून एक धक्कादायक असा निर्णय घेतला आहे.
फर्निचर आयातीवरही डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफ लावण्याचा तयारीत आहेत. तसा प्रस्ताव देखील ठेवण्यात आलाय. पुढच्या 50 दिवस यावर चर्चा आणि काही बैठका घेतल्या जातील आणि त्यानंतरच निर्णय होणार आहे. यादरम्यान अमेरिकेत येणाऱ्या फर्निचरवर नेमका किती टॅरिफ लावायचा याचा निर्णय घेतला जाईल. अमेरिकेला फर्निचर देणाऱ्या देशांसाठी हा मोठा झटका आहे. या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य देखील केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मला या गोष्टीचा विश्वास आहे की, माझ्या या निर्णयामुळे अमेरिकन उद्योग पुन्हा मजबूत होईल आणि देशात उत्पादन वाढेल. टॅरिफच्या निर्णयामुळे बाहेरील देशांचे फर्निचर कमी येईल आणि अमेरिकन कंपन्यांच्या मालाची मागणी बाजारपेठेत अधिक वाढेल. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेनंतर त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आलाय.
वेफेअर, आरएच आणि विल्यम्स-सोनोमा यासारख्या कंपन्यांचे शेअर चांगलेच वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुळात म्हणजे एक काळ असा होता की, अमेरिकन फर्निचर कंपन्यांच्या वस्तूंना मार्केटमध्ये मोठी मागणी होती. मात्र, काही काळापासून या कंपन्यांची घर घर वाढली आहे. अमेरिकन कंपन्यांपेक्षा विदेशी फर्निचरची मागणी वाढल्याचे चित्र होते. मात्र, आता विदेशी फर्निचरवर टॅरिफ लावून अमेरिकेने थेट रस्ताच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अर्थव्यवस्थेला एखाद्या शस्त्रासारखे वापरत असल्याचा दावा हा सातत्याने केला जात आहे.
