US Midterm Election Result : निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा

US Midterm Election Result : अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यांची ही हार होताच त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. हे दोन्ही निर्णय जगाच्या दृष्टीने फायद्याचे आहेत.

US Midterm Election Result : निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा
Donald Trump
Image Credit source: white house
| Updated on: Nov 04, 2026 | 12:16 PM

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी लगेच दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातली एक घोषणा जगाच्या दृष्टीने चांगली आहे. इराणवर हल्ला करण्याची आमची कोणतीही योजना नाही असं फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा होईल. त्याची तारीख लवकरच निश्चित होईल असं त्यांनी सांगितलं. त्याआधी ट्रम्प यांनी इस्रायलला देण्यात येणारी वार्षिक 4 अब्ज डॉलरची मदत रोखण्याची घोषणा केली. ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, “आम्ही या निर्णयाबद्दल इस्रायलच्या पंतप्रधानांना सूचित केलय. इस्रायलला आम्ही यापुढे कोणतीही आर्थिक मदत देणार नाही. पण आम्ही त्यांना शस्त्रास्त्र विकणार”

इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय जगासह भारतासाठी सुद्धा दिलासादायक आहे. कारण इराणवर हल्ला केल्यास ते हॉर्मुज खाडी बंद करु शकतात. परिणामी जगात तेलाच्या किंमती पुन्हा भडकतील. ज्याची सर्वसामान्यांना सर्वाधिक झळ बसेल.

Loading...

त्याचा काय परिणाम होतो ते पाहू

फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “इराणवर पुढे हल्ला करण्याची आमची कोणतीही योजना नाहीय. आता चांगली स्थिती आहे. अमेरिकी राष्ट्रपतींनुसार दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. आम्ही चर्चा करतोय, त्याचा काय परिणाम होतो ते पाहू” सोमवारी दोन नोव्हेंबरला अमेरिकेने इराणच्या केशम बेटावर हल्ला केला. मध्यावधी निवडणुकीच्या प्रस्तावित मतदानाआधी हा हल्ला केला. पण निवडणुकीत ट्रम्प यांना याचा काही फायदा झाला नाही. ट्रम्प यांचा पक्ष काँग्रेस आणि सीनेटमध्ये वाईट पद्धतीने हरला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सीनेटमध्ये रिपब्लिकन पार्टी खूप पिछाडीवर राहणार आहे. काँग्रेस विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सच्या ताब्यात जाईल.

ट्रम्प यांनी दोन घोषणा का केल्या?

1 असोसिएटेड प्रेसनुसार महागाई वाढणं हे सुद्धा ट्रम्प यांच्या पक्षाच्या पराभवाचं एक कारण आहे. इराण विरुद्ध युद्धामुळे अमेरिकी नागरिक महागाईशी झुंज देत आहेत. ट्रम्प यांना यावर नियंत्रण मिळवता येत नाहीय. मिडटर्म इलेक्शनमध्ये महागाई सुद्धा एक मोठा मुद्दा होता.

2 काँग्रेसमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाकडे बहुमत नाहीय. अशावेळी नव्याने युद्ध सुरु करणं त्यांच्यासाठी सोपं नाही. काँग्रेसकडून ट्रम्प यांच्या निर्णयाची समीक्षा होऊ शकते.

3 इस्रायलमध्ये राजकीय अनिश्चितता आहे. बेंजामिन नेतन्याहू यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. आघाडी करुन गादी आयजनकोट सरकार बनवू शकतात. ट्रम्प यांचं इस्रायलपासून लांब होण्याचं हे सुद्धा एक कारण असू शकतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us