मध्यावधी निवडणुकीतील पराभवाने डोनाल्ड ट्रम्प सैरभैर; तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, प्रशासकीय अधिकारी चक्रावले

मध्यावधी निवडणुकीतील पराभवाने डोनाल्ड ट्रम्प सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहेय. या निर्णयाने प्रशासकीय अधिकारी चक्रावले आहेत.

मध्यावधी निवडणुकीतील पराभवाने डोनाल्ड ट्रम्प सैरभैर; तडकाफडकी घेतला मोठा निर्णय, प्रशासकीय अधिकारी चक्रावले
donald trump news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 8:22 AM

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. मध्यावधीमधील निवडणुकीत विरोधकांनी धूळ चारल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील पराभवानंतर तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. ट्रम्प यांनी विश्वासू सहकारी सुझी वाइल्स यांना चीफ ऑफ स्टाफ पदावरून हटवलं. त्यानंतर त्यांच्या जागी स्टीफन मिलर यांची नियुक्ती केली. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या पराभवानंतर घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. त्यात या निवडणुकीने डेमोक्रॅटिक पक्षाने काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवरील नियंत्रण रिपब्लिकन पक्षाकडून हिसकावून घेतलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली आहे. त्यांनी सुझी वाइल्स यांच्या कामाचं कौतुक केलं. तर ते राजकीय संघटनेमोबत कायम राहतील, असेही स्पष्ट केले. तर आता स्टीफन मिलर हे 9 नोव्हेंबर रोजी चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारतील. ते सध्या व्हाइट हाऊसमध्ये डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत आहे.

Loading...

कोण आहेत स्टीफन मिलर?

स्टीफन मिलर हे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रम्प यांचे जवळचे सहकारी म्हणून काम करत आहे. 2016 साली पहिल्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी ट्रम्प यांच्या भाषण लिहिण्याचे काम केलं. ते सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममधील प्रवावशाली सदस्य बनले आहेत.  नव्याने नियुक्ती झालेल्या मिलर यांचं स्थलांतरणांशी धोरण सर्वाधिक चर्चेत राहिलं. हे धोरण इतर देशातून अमेरिकेत राहणार्‍या लोकांसाठी होते. ट्रम्प प्रशासनाने सीमा सुरक्षा इत्यादी धोरणातही महत्त्वाची भूमिका निभावली. आता त्यांचीच व्हाइट हाऊस चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती केली आहे. हे पद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांजवळील मानलं जातं. तसेच या पदावरील राष्ट्राध्यक्षांचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासनात समन्वय साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.   डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us