AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफ प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, थेट मुंबई पोलिसांकडून..

अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी माहिती पुढे येत आहे. टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाला, ज्यात तो थोडक्यात वाचला. या प्रकरणात पोलिस तपास करत असून गेल्या काही महिन्यांपासून हा कट रचला जात असल्याची माहिती मिळतंय.

टायगर श्रॉफ प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, थेट मुंबई पोलिसांकडून..
Tiger Shroff
| Updated on: Nov 07, 2026 | 8:23 AM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात शस्त्र पुरवठादाराचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची धडपड सुरू  आहे.  टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल खरेदी करण्यासाठी 2.5 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे खरेदी केल्याचा संशय आहे. हा व्यवहार QR कोडद्वारे करण्यात आला असून पैसे एका बनावट कागदपत्रांवर उघडलेल्या म्यूल बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. फरार आरोपी अनिल पंडित याच्या सांगण्यावरून अमृतसरमधून शस्त्र खरेदी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार, पोलिसांकडून तपास हा केला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून याचे सर्व नियोजन सुरू होते. पूर्ण कट आखण्यात आला. अनिलचा भाऊ अभिषेक पंडित याला शस्त्र पुरवठादाराकडून QR कोड मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अभिषेकची पत्नी सुनेहा हिने कर्नालमधील SBI खात्यातून 2.5 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची माहिती मिळतंय. बनावट सिमकार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे म्यूल अकाउंट उघडण्यात आल्याने शस्त्र पुरवठादाराची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. अभिषेक पंडितला या प्रकरणात आरोपी घोषित करण्यात आले असून, तो देशाबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस अभिषेक पंडित याच्या शोधात आहेत, पण त्याच्या ठिकाणाचा पत्ता लागत नाहीये. त्यानुसार, अभिषेक पंडित हा विदेशात गेल्याचा संशय आहे. या प्रकरणातील 13 वी आरोपी सुनेहा हिच्या आर्थिक व्यवहारांचीही गुन्हे शाखेकडून तपासणी केली जात आहे. सुमारे 47 लाख रुपयांचे व्यवहार, परदेशी ट्रान्सफर, क्रिप्टोकरन्सी चॅट्स आणि QR पेमेंट्स पोलिसांच्या रडारवर आहेत.

संशयास्पद व्यवहारांपैकी 57 हजार रुपये सुनेहाच्या खात्यात जमा झाले तर तिने ऑक्टोबरच्या पहिल्या 18 दिवसांत मुंबईत 28 हजार रुपये पाठवले. फायरिंगसाठी या पैशांचा वापर नेमका कसा झाला, आरोपींनी लॉजिस्टिक आणि राहण्याची व्यवस्था केली का, याचा तपास सुरू. मुख्य आरोपी अनिल पंडित अद्याप फरार असून शस्त्र खरेदी आणि हल्ल्याच्या नियोजनात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Follow Us
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण