Russia Ukraine War : डोनाल्ड ट्रम्प यांचा युक्रेनला झटका, युद्धाबाबत घेतली अशी भूमिका की सगळीकडे खळबळ!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आता ट्रम्प यांची नवी भूमिका समोर आली आहे.

Russia Ukraine War : डोनाल्ड ट्रम्प यांचा युक्रेनला झटका, युद्धाबाबत घेतली अशी भूमिका की सगळीकडे खळबळ!
donald trump
Updated on: Oct 18, 2025 | 7:41 PM

Donald Trump : सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबलेलं आहे. आता जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला ट्रम्प यांच्याकडून हे युद्ध थांबवण्यासाठी रशियावर दबाव टाकला जात आहे. आता मात्र ट्रम्प यांचा सूर थोडा बदलला आहे. त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी युक्रेनला रशियाच्या ताब्यात गेलेली जमीन विसरून जावी लागेल, असे विधान केले आहे. म्हणजेच युक्रेनला तडजोड करूनच हे युद्ध थांबवता येईल, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

ट्रम्प यांनी नेमके काय संकेत दिले?

या युद्धात रशियाने युक्रेनची बरीच जमीन बळकावलेली आहे. युक्रेनला ही जमीन विसरून तडजोड करावी लागू शकते. तसे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. नुकतेच ट्रम्प आणि युक्रेनचे प्रमुख वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यात बैठक झाली आहे. व्हाईड हाऊसमध्ये ही बैठक पार पडली आहे. ही बैठक संपल्यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनला तडजोड करावी लागू शकते, असे सांगितले आहे.

शुक्रवारी झेलेन्स्की यांच्यासोबत झाली होती बैठक

याआधीही शुक्रवारी (17 ऑक्टोबर) झेलेन्स्की, झेलेन्स्की यांची टीम आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक झाली होती. दोन तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक झाली. या बैठकीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर रशिया-युक्रेनविषयी मत व्यक्त केले होते. आता खूप रक्तपात झाला आहे. दोन्ही देशांनी ते जेथे आहेत तिथेच थांबायला हवे. इतिहासाला निर्णय घेऊ द्या, असे विधान केले होते. तसेच दोन्ही पक्षांनी आपापल्या जागेवरून माघार घेऊन युद्ध थांबवावे असेही संकेत ट्रम्प यांनी कले होते.

गुरुवारी झाली होती पुतीन यांच्याशी चर्चा

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी गुरवारी (16 ऑक्टोबर) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली होती. या चर्चेनंतर ट्रम्प यांन पुढे येत पुढच्या काही आठवड्यांत हंगेरी येथील बुडापेस्ट येथे पुतीन यांना भेटण्याचे नियोजन आखले जात आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांचे युक्रेनसंदर्भातील मत बदलले आहे.

सुरुवातीला केली मदत आता मात्र…

अमेरिकेने या युद्धात युक्रेनची वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलेली आहे. मात्र आता अमेरिकेची युक्रेनला लाबं पल्ल्याच्या मिसाईल्स देण्याची तयारी नाही. त्यामुळेही सध्या ट्रम्प यांचे युक्रेनबाबतचे धोरण काहीसे बदलले आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? झेलेन्स्की यांनी रशियाच्या ताब्यात असलेली जमीन सोडून द्यावी लागणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.