
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचे फायदे सांगितले आहेत. “अमेरिका माझ्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे आणि टॅरिफ धोरणाची निंदा करणारे मूर्ख आहेत” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. टॅरिफमधून जो पैसा गोळा होतोय, त्याचा विनियोग कसा करणार? या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला मोठा शब्द दिला आहे. “टॅरिफमधून जो महसूल जमा होतोय, त्यातून प्रत्येक अमेरिकी नागरिकाला 2 हजार डॉलरचा डिविडेंड देणार” असं आश्वासन ट्रम्प यांनी दिलय. टॅरिफची धमकी देऊन जगाला घाबरणारे डोनाल्ड ट्रम्प यामुळे अमेरिकेला होणारे फायदे सांगत आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लेटफॉर्मच्या नव्या पोस्टमध्ये आपल्या व्यापार नितीचा प्रचार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत आणि सन्मानित देश असल्याचा दावा केला. यातून रेकॉर्ड स्टॉक वॅल्यू, हाय 401(K) बॅलन्स आणि नवे कारखाने लागत आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला.
आपल्या टॅरिफ धोरणामुळे अमेरिकाआर्थिक दृष्टया मजबूत होत आहे असा दावा ट्रम्प यांनी केला. त्यांनी टॅरिफला विरोध करणाऱ्या, टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. ‘जे लोक टॅरिफ विरोधात आहेत, ते मूर्ख आहेत!’ असं ट्रम्प यांनी म्हटलं. टॅरिफमुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी दोन्ही वाढल्या आहेत, असा तर्क डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला. टॅरिफमधून जो महसूल मिळतोय, त्यातून सर्व अमेरिकी नागरिकांना (हाय इनकमवाले सोडून) डिविडेंड स्वरुपात 2000 डॉलर देणार असल्याचं आश्वसान ट्रम्प यांनी दिलं. हे पेमेंट कधी आणि केव्हा देणार? हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलं नाही.
अमेरिकेवर किती कर्ज?
टॅरिफमधून जो रेवेन्यू गोळा होतोय, त्याद्वारे अमेरिकेला अब्जावधी डॉलरचा इनकम होतोय. त्याचा उपयोग अमेरिकेच्या विद्यमान कर्जफेडीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. सध्या अमेरिकेवरील हे कर्ज 37 ट्रिलियन डॉलर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबद्दल कायदेशीर अनिश्चितता असताना ट्रम्प यांनी हा ताजा दावा केला आहे.