जग युद्धातून सुटणार? इराणसोबतच्या युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

Donald Trump : अमेरिका इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता या युद्धाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

जग युद्धातून सुटणार? इराणसोबतच्या युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
Trump and War
Image Credit source: Google
| Updated on: Mar 11, 2026 | 9:13 PM

इराण आणि इस्रायल अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिका इस्रायल सतत इराणवर हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता या युद्धाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘इराणसोबत सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, कारण हल्ल्यासाठी आता फारसे टार्गेट उरलेले नाहीत. त्यामुळे युद्ध थोडेसे बाकी आहे, पण मला जेव्हा वाटेल तेव्हा मी युद्ध संपवू शकतो.’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंतिम निर्णयाकडे जगाचे लक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लष्करी कारवाई कधी थांबवायची याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे हे युद्ध आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रंप आता युद्ध थांबवण्याचा अंतिम निर्णय कधी घेतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

युद्ध यशस्वी ठरले – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी Axios या न्यूज वेबसाइटला छोटी मुलाखत दिली. यात त्यांनी सांगितले की ‘हे युद्ध अमेरिकेच्या योजनेपेक्षाही अधिक यशस्वी ठरले आहे. ठरवलेल्या सहा आठवड्यांच्या योजनेपेक्षा अमेरिकेने इराणला अधिक नुकसान पोहोचवले आहे. इराणची शत्रुता फक्त अमेरिका आणि इस्रायलपुरती मर्यादित नव्हती, तर तो संपूर्ण मध्यपूर्वेला लक्ष्य बनवू इच्छित होता. गेल्या 47 वर्षांत इराणने जो हिंसाचार आणि विनाश पसरवला आहे, त्याची किंमत तो आता चुकवत आहे.

युद्ध सुरूच राहणार – इस्रायल

तर दुसरीकडे इस्रायलच्या संरक्षण मंत्र्‍यांनी बुधवारी सांगितले की हे युद्ध कोणत्याही ठराविक कालमर्यादेशिवाय सुरू राहील. त्यांनी स्पष्ट केले की सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत आणि पूर्ण विजय मिळेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील. आता अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देश किमान आणखी दोन आठवडे इराणवर हल्ले करण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे आता आगामी काळात काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us