AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुप्त आदेशावर थेट सह्या, लीक झाली धक्कादायक माहिती, जगाची चिंता वाढली…

डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच नेम राहिला नाही. नुकताच गाझा-इस्त्रायल युद्धात त्यांनी मोठी घोषणा केली असून शनिवारपासून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता गुप्त करारावर सह्या केल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुप्त आदेशावर थेट सह्या, लीक झाली धक्कादायक माहिती, जगाची चिंता वाढली...
Donald Trump signing
| Updated on: Oct 11, 2025 | 9:25 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून धक्कादायक निर्णय घेत आहेत. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम फक्त अमेरिकाच नाही तर जगावर होत आहे. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर त्यांनी आता थेट चीनवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा हैराण करणारा निर्णय घेतला. ब्राझीलवरही 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असून ब्राझीलने अमेरिकेसोबतचे सर्व संबंध तोडली आहेत. ट्रम्प यांनी आता मेक्सिकोशी सामना करण्याचा निर्णय घेतला आहे. नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नसल्याने डोनाल्ड ट्रम्प निराश झाले. त्यांनी आपली नाराजी जगजाहीरपणे बोलून दाखवली. भारत-पाकिस्तान युद्धाबाबत ते मोठा दावा करताना दिसले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याला भारताने साथ दिली नाही.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत गुप्त आदेशावर सह्या केल्या. या कायद्यानुसार, लॅटिन अमेरिकन ड्रग्ज कार्टेल्सविरुद्ध अमेरिकेची लष्करी कारवाई परदेशात करता येईल. याचा अर्थ ट्रम्प यांनी मेक्सिकोमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच मेक्सिकोमधून येणारे जहाल थेट अमेरिकेने उडवून दिले आणि दावा केला की, या जहाजमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज होते, त्यानंतर अमेरिकन लष्कराने कारवाई केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आदेशावर सह्या केल्याने आता नौदल आणि इतर लष्करी तुकड्यांना परदेशी किनाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची परवानगी मिळाली. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिकन सैन्याला मेक्सिकोमध्ये प्रवेश दिला जाणार नाही किंवा अमेरिकन सैन्य मेक्सिकोच्या भूमीत येऊन कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकणार नाही. ड्रग्ज विरोधात आम्ही सहकार्य करू आणि समन्वय साधू पण लष्कराचा हस्तक्षेप सहन करणार नाहीत.

कार्टेल्सविरुद्ध कोणतीही कारवाई दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाच्या आत आणि करारानुसार केली जाईल. ट्रम्प प्रशासनाने आठ ड्रग्ज कार्टेलना दहशतवादी संघटना म्हणून औपचारिकपणे घोषित केले. त्यापैकी सहा मेक्सिकन संघटना आहेत. आता मेक्सिकोविरोधातील कारवाई डोनाल्ड ट्रम्प यांची वाढवण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून जगाला हादरवणारे निर्णय घेताना सतत दिसत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.