‘नेतान्याहू वेड्यासारखे वागत आहेत…’, ट्रम्प टीम इस्रायली पंतप्रधानांवर संतापली

trump and netanyahu: इस्त्रायल आणि तुर्कीमधील तणाव वाढला आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या राजदूताच्या मदतीने युद्धबंदीचा मार्ग शोधला. परंतु इस्रायली सैन्याच्या कारवाया कमी झाल्या नाहीत. यामुळे अमेरिका आता नाराज आहे.

नेतान्याहू वेड्यासारखे वागत आहेत..., ट्रम्प टीम इस्रायली पंतप्रधानांवर संतापली
| Updated on: Jul 21, 2025 | 8:02 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील मतभेद समोर आले आहे. व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात खुलासा केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीम इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या आक्रमक लष्करी रणनीतींमुळे अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे.

इस्रायली हवाई दलाने नुकतेच गाझा पट्टी आणि सीरियाच्या राष्ट्रपती भवनाला लक्ष्य करत हल्ला केला होता. नेतन्याहू यांच्या या कृतीमुळे अमेरिकेच्या जागतिक शांतता उपक्रमांना धक्का बसत आहेत. एका अधिकाऱ्याने म्हटले की, नेतन्याहू सर्वत्र बॉम्ब टाकत आहेत. हे वेडेपणासारखे आहे.

ट्रम्प यांनी फोन करून मागितले स्पष्टीकरण?

अ‍ॅक्सिओसच्या अहवालानुसार, गाझामधील कॅथोलिक चर्चवर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः नेतान्याहू यांना फोन करून स्पष्टीकरण मागितले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेतान्याहू जवळजवळ दररोज एक नवीन हल्ला करत आहे. हा न संपणारा प्रकार आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाचा नेतन्याहू यांच्यावरील विश्वास झपाट्याने कमी होत चालला आहे. कधीकधी नेतन्याहूची कृती बंडखोर मुलासारखी असते. ते चिडचिडा करतात आणि अस्थिर दिसतात, असे त्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

तुर्कीसोबत युद्धबंदीनंतरही हल्ला

इस्त्रायल आणि तुर्कीमधील तणाव वाढला आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या राजदूताच्या मदतीने युद्धबंदीचा मार्ग शोधला. परंतु इस्रायली सैन्याच्या कारवाया कमी झाल्या नाहीत. तुर्कीमधील अमेरिकेचे राजदूत टॉम बराक यांनी दोनच दिवसांपूर्वी घोषणा करत सांगितले होते की, इस्रायल आणि सीरिया या दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. तुर्की, जॉर्डन आणि शेजारील देशांनी या युद्धबंदीला पाठिंबा दिला आहे.

सीरियाच्या दक्षिणेकडील ड्रुझ-बहुल प्रांतात हिंसाचार भडकल्यानंतर इस्रायलने बुधवारी दमास्कसमध्ये हल्ले सुरू केले होते. यासोबतच दक्षिणेकडे पुढे जाणाऱ्या सरकारी सैन्यावर हल्ला केला आणि त्यांच्या माघारीची मागणी केली होती.