AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tariff War: अमेरिकेला भारताचा झटका; व्यापारी कराराबाबत मोठा निर्णय, आता ट्रम्प रडकुंडीला, घडलं तरी काय?

India-US Tariff War: जगावर दादागिरी करणाऱ्या अमेरिकेला भारताने दणका दिला आहे. व्यापारी कराराबाबत भारताने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

Tariff War: अमेरिकेला भारताचा झटका; व्यापारी कराराबाबत मोठा निर्णय, आता ट्रम्प रडकुंडीला, घडलं तरी काय?
भारत-अमेरिका व्यापारी करारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 17, 2026 | 9:25 AM
Share

India-America Trade Agreement: भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करारावर या महिन्यात, मार्चमध्ये हस्ताक्षर होणार होते. पण भारताने या व्यापारी कारराला ब्रेक लावला. या महिन्यात हा व्यापारी करार होणार नसल्याची माहिती वाणिज्य खात्याचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. अमेरिका संपूर्ण जगासाठी टॅरिफ प्रणाली विकसीत करण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प प्रशासनाची धोरणं समोर आल्यानंतरच त्यावर स्वाक्षरी करणे योग्य राहिल. अग्रवाल यांनी सोमवारी दोन्ही देशातील व्यापारी सांख्यिकी जाहीर केली.

वाणिज्य सचिव काय म्हणाले?

वाणिज्य सचिवांनी सोमवारी सांगितले की अमेरिका व्यापारी धोरणाच्या अनुच्छेद 122 अंतर्गत सध्या जगावर केवळ 10 टक्के टॅरिफ लावण्यात येत आहे. अमेरिकेसोबत होत असलेला व्यापारी करार सध्याच्या टॅरिफच्या उलट असेल. हा व्यापारी करार पूर्णपणे तयार आहे. अर्थात भारताने व्यापारी करार टाळलेला नाही वा त्यावरून कोणता वादही नाही. पण दोन्ही देशांमध्ये कराविषयी चर्चा सुरू आहे. या व्यापारी करारावर भारताने अद्याप स्वाक्षरी केली नसल्याचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले. अमेरिकेकडून जे टॅरिफ लावण्यात येणार आहे, त्याविषयी भारताला स्पष्टता हवी आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या या भूमिकेने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. प्रत्येक देशाचे व्यापारी धोरण गृहीत धरण्याचे आणि आपण म्हणू त्याच अटी-शर्ती मान्य करण्याच्या ट्रम्प यांच्या हेकेखोरीला हा झटका मानल्या जात आहे. एका आठवड्यापूर्वी अमेरिकेने जगातील 16 देशांच्या व्यापारी धोरणांचे पुन्हा समीक्षा सुरू केली आहे. त्यात भारतासह बांगलादेश आणि इतर देशांचाही समावेश आहे. त्यामुळे टॅरिफ लादण्याची नवीन चाल प्रशासन शोधत असल्याचे मानले जात आहे.

रशियाकडून इंधन खरेदी वाढली

इराण-इस्त्रायल यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान इंधन संकट टाळण्यासाठी भारताने रशियाकडून इंधन खरेदी वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. अमेरिका-इस्त्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी हे कुटुंब आणि सहकाऱ्यांसह ठार झाले. इराणने होर्मुज समुद्रधुनीतून जहाजांचे दळवळण ठप्प झाले आहे. भारताच्या विनंतीनंतर इराणने दोन तेलवाहू जहाजं भारतातकडे रवाना करण्यास मंजुरी दिली. पण भारतात नैसर्गिक वायूच्या तुटवड्यानं नागरिक रांगेत उभे ठाकले आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. तर सीएनजी आणि एलपीजीसाठी लांबच लांब रांगा दिसून येत आहे. हे संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली