
Melania Trump AI Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना अमेरिकेच्या फस्ट लेडी म्हणून ओळखले जाते. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. एक्स, फेसबूक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियांवर त्या नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतात. दरम्यान, सध्या त्यांनी एक्स या समाजमाध्यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एआय जनरेटेड मेलानिया ट्रम्प दिसत आहेत.
मेलानिया ट्रम्प यांनी हा फोटो त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर शेअर केला आहे. अगोदर हा व्हिडीओ @TrueMELANIAmeme या एक्स खात्यावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओवर कोणताही आक्षेप न घेता त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या एक्स खात्यावर सेअर केला आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनदेखील एआय जनरेडेट व्हिडीओज पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे ट्रम्प कुटुंबीयांकडून एआयला फार महत्त्व दिले जात आहे. भविष्यात ट्रम्प यांचा एआय संदर्भातील दृष्टीकोनच यातून स्पष्ट होत असल्याचे म्हटले जात आहे.
मेलानिया यांनी हा व्हिडीओ रिट्विट करताना इनटू द फ्यूचर असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत मेलानिया ट्रम्प यांचा डिजीटल अवतार दाखवण्यात आला आहे. व्हिडीओत मेलानिया एका छान अशा ड्रेसमध्ये दिसत आहेत. एका इमारतीच्या खोलीत त्या उभ्या असल्याचे दिसत आहेत. अचानक त्या समोर प्रकट होतात, असेच हा व्हिडीओ पाहून वाटत आहे. विशेष म्हणजे त्या या व्हिडीओत डोळ्यांच्या पापण्यादेखील मिचकवत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये मेलानिया ट्रम्प यांची हेअर स्टाईलदेखील खूपच छान दिसत आहे. आतापर्यंत 13 लाख लोकांनी या व्हिडीओला पाहिले आहे.
Into The Future. pic.twitter.com/hTsi5VThiZ
— MelaniaMeme (@TrueMELANIAmeme) October 1, 2025
दरम्यान, या व्हिडीओची सध्या सगळीकडेच चर्चा चालू आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी रिट्विट केला आहे. तसेच हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. काही लोकांनी मेलानिया ट्रम्प यांची प्रशंसा काेली आहे. तर काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय हे मात्र नक्की.