…अन् जगाचं टेन्शन वाढवणारे ट्रम्प त्यांना पाहताच आनंदानं नाचायला लागले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट डान्स Video

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जपान दौऱ्यामध्ये चक्क डान्स केला आहे, त्याचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रम्प यांचा डान्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

...अन् जगाचं टेन्शन वाढवणारे ट्रम्प त्यांना पाहताच आनंदानं नाचायला लागले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा भन्नाट डान्स Video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 28, 2025 | 6:43 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या जगाचं टेन्शन वाढवलं आहे, त्यांनी अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावला आहे, तर चीनसोबत थेट व्यापार युद्धच सुरू केलं आहे. एकीकडे ट्रम्प यांच्यामुळे जगाची चिंता वाढली असतानाच मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसून येत नाहीये, त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते डान्स करताना दिसत आहेत.

नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक जॅक्सन स्टाईलमध्ये डान्स केला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान दौऱ्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काही लोकांना पाहून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड आनंद झाला आहे, आणि त्यांनी थेट स्टेजवर जाऊन डान्स करायला सुरुवात केली, डोनाल्ड ट्रम्प यांनी मायकल जॅक्सन स्टाईल डान्स केला आहे. इंटरनेटवर ट्रम्प यांचा हा नवा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आशिया दौऱ्यामध्ये दोनदा डान्स केला आहे, पहिला डान्स त्यांनी मलेशियामध्ये पाऊल ठेवताच केला होता, त्याचा देखील एक व्हिडीओ समोर आला, त्यानंतर आता ट्रम्प यांनी आपल्या जपान दौऱ्यामध्ये देखील डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प हे स्टेजवर उभे आहेत, त्यांच्या बाजुलाच त्यांचे सुरक्षा अधिकारी देखील आहेत. संगीत वाजत आहे, आणि ट्रम्प हे डान्स करत आहेत, असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे, ट्रम्प यांच्या या नव्या अंदाजामुळे सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

 

ट्रम्प यांचा जपान दौरा यशस्वी झाला आहे, त्यांनी जपानबरोबर मोठी डील केली आहे, त्याचा आनंद साजरा करण्यासाठीच ट्रम्प यांनी डान्स केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेनं जपानसोबत मोठा करार केला आहे. ज्यातून अमेरिकेला मोठा फयदा होण्याची शक्यता आहे.