विमानामध्ये दारूच्या नशेत महिलेनं ओलांडल्या सगळ्या मर्यादा, पुरुष प्रवाशांसमोरच…., घटनेनं खळबळ
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, दारूच्या नशेत असलेल्या महिलेनं विमानात जोरदार राडा केला आहे. अखेर या महिलेला पोलिसांनी अटक केलं असून, तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तिच्यावर डेल्टा एअरलाइन्सच्या एअर होस्टेससोबत गैरवर्तणूक आणि हल्ला केल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यानं सांगितलं की, या महिलेनं डेल्टा एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांसह विमानातील अनेक प्रवाशांवर हल्ला केला आहे. त्यानंतर तिला विमानतळावर अटक करण्यात आली. कोडी सिएल मेरी ब्रायन असं या 31 वर्षांच्या महिलेचं नाव आहे. बुधवारी दोन ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. या महिलेवर लैंगिक शोषण, मारहाण आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं या सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की केरी सिएरा ब्रायन हिने सॉल्ट लेक सिटी वरून पोर्टलँड, ओरेगनला जाणाऱ्या विमानामध्ये दारूच्या नशेत जोरदार राडा केला आहे. त्यानंतर तिला पोलिसांनी या प्रकरणात अटक केलं आहे. तिच्यावर विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेनं विमानात प्रवेश करताच राडा करण्यास सुरुवात केली. फ्लाइट अटेंडन्सकडून तिला दरवाजातून बाजूला जाण्यास सांगण्यात आले, मात्र तिने त्याला नकार दिला. त्यानंतर ही महिला जेव्हा आपल्या सीटकडे गेली त्या दरम्यान तिने एका विमान कर्मचार्यावर हल्ला केला. या महिलेचा हल्ला एवढा शक्तिशाली होता की हा कर्मचारी हल्ल्यामध्ये खाली पडून जखमी झाला.
त्यानंतर या महिलेला विमानातून उतरण्याची सूचना दिली, तेव्हा या महिलेनं महिला विमान कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला केला. त्यानंतर या महिलेला विमानातून खाली उतरवत असताना या महिलेनं महिला पोलीस कर्मचाऱ्यावर देखील हल्ला केला. महिला पोलिसाचे केस आपल्या हातात पकडून या महिलेनं जोरदार हल्ला केला. ती दारूच्या नशेत होती, कोणाचंही ऐकायला तयार नव्हती, दरम्यान आता पोलिसांनी या महिलेला अटक केली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.
