America Shutdown : अमेरिका हादरली! शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सर्वात मोठं संकट, लाखो नोकऱ्या…

सध्या अमेरिकेत शटडाऊन लागू झाले आहे. या शटडाऊनमुळे अनेकांच्या सरकारी नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

America Shutdown : अमेरिका हादरली! शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे सर्वात मोठं संकट, लाखो नोकऱ्या...
donald trump and shutdown
| Updated on: Oct 02, 2025 | 6:04 PM

America Shutdown : अमेरिकेत शटडाऊन लागून 24 तास उलटून गेले आहेत. काँग्रेसमध्ये निधी विधेयक मंजूर न झाल्याने आता हे शटडाऊन लागू झाले असून त्याच फाटका आत ट्रम्प सरकारला बसायला सुरुवात झाली आहे. शटडाऊन लागू होताच आता अमेरिकेत सरकारी आस्थापनांची कार्यालये बंद होण्यास सुरुवात झाली आहे. हा शटडाऊन थांबावा यासाठी सिनेटमध्ये एक प्रस्ताव आणण्यात आला. मात्र या प्रस्तावावरही सहमनी न होऊ शकल्याने आता ट्रम्प सरकारपुढे आव्हानच निर्माण झाले आहे. अनेक सरकारी कर्चमाऱ्याच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शटडाऊनचं कारण काय?

ट्रम्प सकारला सिनेटमध्ये निधी विधेयक मंजूर करता आलेले नाही. याविधेयकाच्या बाजूने 55 तर विरोधात 45 मते पडली. हे विधेयक मंजूर होण्यासाठी विधेयकाच्या बाजूने कमीत कमी 60 मते पडणे गरजेचे होते. मात्र आता हे विधेयक मंजूर न झाल्याने आता 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून अमेरिकन सिनेटने सरकारचा निधी पुरवठा बंद केला आहे. निधीच नसल्याने आता ट्रम्प सरकारला शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी तसेच इतर प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळेच आता शटडाऊन लागू करण्यात आला आहे.

…तर अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

अमेरिकेत शटडाऊन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात शटडाऊन लागू करण्यात आले होते. तेव्हाही अशाच पद्धतीने शसकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आले होते. आता पुन्हा एकदा निधी विधेयकावर तोडगा न निघाल्यास अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे याबाबतच इशारा व्हाईट हाऊस आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी दिला आहे.
दरम्यान, आता निधी विेधेयक मंजूर न झाल्यास आगामी किती दिवस अशाच पद्धतीने शटडाऊन राहणार? हा शटडाऊन असाच चालू राहिला तर आगामी काळात अमेरिकेत किती सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार? अशी स्थिती उद्भवू नये यासाठी ट्रम्प सरकार नेमके काय करणार? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.